मी साठीनंतर निर्णय घेतलाय, तुम्ही तर चाळीशीच्या आत…अजितदादांचा शरद पवारांना टोला
Ajit Pawar On Sharad Pawar : बारामतीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. शरद पवार (Ajit Pawar) यांच्या वयाचा मुद्दा अजित पवारांना पुन्हा काढत त्यांना डिवचले आहे. मी साठीनंतर वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे. तुम्ही तर चाळीशीच्या आताच वेगळी भूमिका घेतली होती, असा टोलाच अजित पवारांनी शरद पवारांना (Sharad Pawar) लगावला आहे.
Maratha Reservation : सरकारच्या मनात काय? नानांनी गंभीर आरोप करीत सांगितलं
अजित पवार म्हणाले, मी वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे. त्याची जोरदार चर्चा होते. माझे विचार कायम स्पष्ट असतात. हे तुम्हाला माहीत आहे. मी तर 60 वर्षानंतर वेगळी भूमिका घेतली आहे. काहींनी तर त्यावेळेस 38 व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली आहे. यशवंतराव चव्हाणांना विरोध होता. वसंतदादा पाटील यांना बाजूला केले गेले. त्यांचे नेतृत्वही चांगले होते. तरी देखील वसंतदादाला बाजूला करू जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
मागे कोणी निर्णय घेतला नाही असेही नाही. मी साठीच्या पुढे निर्णय घेतला आहे. काहींनी तर चाळीशीच्या आत निर्णय घेतला आहे. तुम्हा मला समजून घ्या, असे आवाहन अजितदादांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
‘…तर 500 खासदारांचा कार्यक्रमच आटोपला असता’; संसद घुसखोरीवरुन सुळेंचा हल्लाबोल
शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीवर अजित पवार म्हणाले, मी मागेही सांगितले आहे. प्रत्येकाचा काळ असतो. आपण जास्त वय झाल्यानंतर घराच्यांना सांगतो, आराम करा. तुमचा अनुभव, ज्ञान द्या, सूचना करा, असे सांगतो.
तर तेव्हा वेगळी भूमिका…
माझ्या राजकीय भूमिकेवर आज पण मोठी चर्चा होते. मी बारामतीकरांना आजपण सांगतो. मी जी काही भूमिका घेईल. त्यात बारामतीकरांचे हित असेल. मला ज्या दिवशी कळेल, यात बारामतीकरांचे हित नाही. त्या दिवशी मी वेगळी राजकीय भूमिका घेतलेली पाहिला मिळेल. पण देश पातळीवर नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही हे पण लक्षात ठेवा, असे अजित पवार म्हणाले.
ते दमदाटी करून माझ्याबरोबर आले नाहीत
पक्षातील 53 आमदारांपैकी 43 आमदार माझ्याबरोबर आले आहेत. विधानपरिषदेतील नऊ आमदारांपैकी सहा आमदार माझ्याबरोबर आले आहेत. दोन अपक्ष आमदार माझ्याबरोबर आले आहेत. सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा मला आहे. दमदाटी करून माझ्याबरोबर आले नाहीत, असेही अजित पवारांनी सांगितले.