‘…तर 500 खासदारांचा कार्यक्रमच आटोपला असता’; संसद घुसखोरीवरुन सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule : संसदेत शिरलेल्या घुसखोरांकडे स्फोटके, धूरामध्ये विषाक्त असते तर 500 खासदारांचा कार्यक्रमच आटोपला असता, अशी खरमरीत टीका करीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सुळे यांनी पुण्यातून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.
INDW vs AUSW : कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय महिलांचा पराक्रम; पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला चारली धूळ
सुप्रिया सुळे म्हणाल्या, संसदेत घुसखोरांना हल्ला केला त्यात हल्लेखोरांकडे स्फोटक, धुरामध्ये विषाक्त, किंवा आत्मघातकी हल्ला केला असता तर संसदेत उपस्थित असलेल्या 500 खासदारांचा कार्यक्रमच आटोपला असता, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी बोलताना सुळे यांनी ज्या दिवशी संसदेत घुसखोरी झाली तेव्हाची सत्य परिस्थितीच सांगितली आहे.
‘यूपी-बिहारचे लोक तामिळनाडूत टॉयलेट साफ करतात’; द्रमुकच्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
मला अभिमान वाटतो एका गोष्टीचा संसदेवर धूर सोडण्यात आला तेव्हा सर्व खासदारांनी राजकारण बाजूला सारुन स्वत:ला वाचवलं. त्या दिवशी संसदेत सुनिल तटकरे होते की नाही हे मला माहित नाही. पण त्या दिवशी संसदेत आतमध्ये एकही पोलिस नव्हता. घुसखोरांनी हल्ला केला तेव्हा सर्व खासदारांनी मिळून घुसखोराला पकडलं, असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचा ‘मोदी गॅरंटी’वर भर, दिल्लीतील बैठकीत ठरली रणनीती
तसेच संसदेतून त्यावेळी एक खासदार सोडून कोणीही पळून गेले नाही. सर्वजण एकमेकांची मदत करीत होते. महागाई, कांद्याला भाव, संसदेच्या सुरक्षेवर चर्चा करण्याची मागणी आम्ही केलीयं ही चूक आहे? त्याची शिक्षा अशी निलंबन करुन का? असा सवाल करीत देशात लोकशाही नाहीतर आणीबाणी सुरु झाल्याचा आरोपही सुळे यांनी केला आहे.
…तर विधेयकं मंजूर झाले नसते :
दिल्लीत दडपशाही चालली असून विरोधी खासदारांचं निलंबन करुन चार विधेयक पास केले आहेत. आम्ही संसदेत असतो तर त्याचा विरोध केला असता. आता निवडणूक आयोगाचा अध्यक्ष कोण हे भारत सरकार ठरवणार आहे. सर्वांचे फोनही टॅप होणार आहेत. चारही विधेयकांना विरोध होणार हे त्यांना माहिती होतं त्यामुळेच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा आरोपही सुळे यांनी केला आहे.
दरम्यान, संसदेच्या सुरक्षेप्रकरणी संसदेत विरोधी खासदारांनी आवाज उठवून गदारोळ घातल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरुन विरोधी खासदारांवर लोकसभेच्या सभापतींनी उर्वरीत सत्रासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरु झालं आहे.