लोकसभा निवडणुकीत भाजपचा ‘मोदी गॅरंटी’वर भर, दिल्लीतील बैठकीत ठरली रणनीती

  • Written By: Published:
लोकसभा निवडणुकीत भाजपचा ‘मोदी गॅरंटी’वर भर, दिल्लीतील बैठकीत ठरली रणनीती

Prime Minister Modi : आगामी वर्षात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. भाजप ‘मोदींची गॅरंटी’ हा महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत बनवणार आहे. दिल्लीतील भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक आज संपली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचाराचा विषय ‘मोदींची गॅंरटी’ असेल, असे या बैठकीनंतर समोर आले आहे. पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्ड या दोघांनीही या बैठकीला संबोधित केले. दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला. सूत्रांनी सांगितले की, ‘मोदीची गॅरंटी’ ही घोषणा भाजपच्या प्रचारातील प्रमुख विषयांपैकी एक असणार आहे.

पवारांच्या विद्या प्रतिष्ठानच्या एका प्रकल्पासाठी गौतम अदानींकडून तब्बल 25 कोटींची मदत !

मोदींची गॅरंटी या घोषणेवर भर

यंदा झालेल्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांपैकी तीन राज्यात भाजपचा मोठ्या मताधिक्याने विजय झालं. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतंना देशात केवळ एकच गॅंरटी, मोदींची गॅरटी आहे, गॅरंटीचं दुसरं नाव म्हणजे मोदी असं म्हटलं होतं. त्यानंतर आता हीच घोषणा भापज लोकसभा निवडणुकीत वापरणार आहे.

Maratha Reservation बद्दल विखेंचं मोठं वक्तव्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता…

सुत्रांनी सांगितले की, या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अवलंबलेली रणनीती सांगितली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 2024 च्या निवडणुकीसाठी कार्यक्रमांचे कॅलेंडरही दिले. ‘मोदींची गॅरंटी’ या घोष वाक्याखाली भाजपची निवडणूक आश्वासने असणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ही घोषणा भाजपने वारंवार वापरली होती.

10 टक्के मते वाढवण्याची योजना
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना सल्ला देतांना सांगितले की, इतरांच्या नकारात्मक प्रचारात अडकण्याऐवजी त्यांनी प्रत्येक भारतीयाचा विश्वास जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकीत 10 टक्के मते वाढवण्यासाठी बूथ स्तरापर्यंत काम करण्याचा सल्ला मोदींनी दिला.
बैठकीत पक्षाच्या नेत्यांना गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांवर जास्तीत जास्त लक्ष करा. त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवा. युवकांशी अधिकाधिक संपर्क करा, डिजीटल व सोशल मीडियाचा वापर योग्य पध्दतीने करा, असंही मोदींनी सांगतिलं.

‘विकसित भारत संकल्प यात्रे’वर भर

याशिवाय ‘विकास भारत संकल्प यात्रे’त सहभागी व्हा आणि या यात्रेशी लोकांना जोडण्यावर पूर्ण भर द्या, असा सल्लाही त्यांनी बैठकीत पक्षश्रेष्ठींना दिला. ते म्हणाले की, भाजप सरकारच्या सर्व लोककल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचेल याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा दाखला देत पंतप्रधानांनी पक्षाच्या नेत्यांना पूर्ण तयारीनिशी जनतेमध्ये जाण्याचे आवाहन केले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube