‘यूपी-बिहारचे लोक तामिळनाडूत टॉयलेट साफ करतात’; द्रमुकच्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

‘यूपी-बिहारचे लोक तामिळनाडूत टॉयलेट साफ करतात’; द्रमुकच्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

Dayanidhi Maran : देशात उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय हा वाद काही नवा नाही. दक्षिणेतील राजकीय नेते संधी मिळेल तेव्हा उत्तर भारतीयांवर आगपाखड करत असतात. आताही तामिळनाडूतील द्रमुक नेते खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी उत्तर भारतीयांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. युपी-बिहारमधील हिंदी बोलणारे लोक आपल्या राज्यात येऊन टॉयलेट आणि रस्ते साफ करतात. ते फक्त हिंदी शिकतात. त्यांना इंग्रजीही बोलता येत नाही. जे इंग्रजी शिकतात ते आयटी कंपन्यांत चांगली नोकरी करतात, असे वादग्रस्त वक्तव्य मारन यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजप आक्रमक होताना दिसत आहे.

तामिळनाडूत भाजपाला मोठा धक्का, AIADMK ने केली युती तोडण्याची घोषणा

भाजपाच्या काही नेत्यांनी दयानिधी मारन यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियाव शेअर केला आहे. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे याची माहिती नाही. विरोधी पक्षांकडून देशात फूट पाडण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. द्रमुक नेते उत्तर भारतीय आणि हिंदी भाषेविरुद्ध अशी वादग्रस्त विधाने सातत्याने करत असतात. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान डीएनके खासदार डॉ. सेंथिलकुमार यांनी हिंदी भाषिक राज्यांना गोमूत्र राज्य म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.

लोकसभेतील भाषणात सेंथिलकुमार म्हणाले होते की भाजपाची ताकद फक्त हिंदी पट्ट्यातील राज्यांत जिंकण्यापुरतीच मर्यादित आहे ज्यांना आम्ही गोमूत्र राज्य म्हणतो. दक्षिणेतील राज्यात आम्ही भाजपाचा शिरकाव होऊ दिलेला नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर सेंथिलकुमार यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला होता. इतकेच नाही तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही अनेक प्रसंगी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

भाजप फक्त गोमूत्र राज्यांत निवडणूक जिंकतं; द्रमुकच्या खासदाराने टाकली वादाची ठिणगी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube