‘भाजप फक्त ‘गौमुत्र राज्यांत’ निवडणूक जिंकतं’; द्रमुकच्या खासदाराने टाकली वादाची ठिणगी

‘भाजप फक्त ‘गौमुत्र राज्यांत’ निवडणूक जिंकतं’; द्रमुकच्या खासदाराने टाकली वादाची ठिणगी

D. N.V. Senthilkumar : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान डीएमके खासदार डी.एन.वी.सेंथिलकुमार एस(D. N.V. Senthilkumar) यांनी भाजपच्या तीन राज्यांच्या एकहाती विजयावरुन टीकास्त्र सोडलं आहे. भाजपने फक्त हिंदी राज्यातील निवडणूक जिंकलीयं, त्यांना आम्ही ‘गौमुत्र’ राज्य असं म्हणतो, जनतेने याचा विचार करायला हवा, असं म्हणत त्यांनी वादाची ठिणगी टाकली आहे. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस होता. तामिळनाडूमधील अण्णा द्रमुकच पक्षाने या वादाला सुरुंग लावलं आहे. त्यावरुन आता भाजपच्या खासदारांकडूनही संताप व्यक्त करण्यात आला आहे.

काय म्हणाले खासदार सेंथिलकुमार?
हिंदी बेल्टमधील तीन राज्ये भाजपने जिंकली आहेत. त्यावरुन खासदार सेंथिलकुमार यांनी संसदेतच भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. देशातल्या जनतेने याचा विचार करायला हवा की, भाजपची ताकद फक्त हिंदी राज्यातली निवडणूक जिंकणं आहे, त्या राज्यांना आम्ही सर्वसामान्यपणे ‘गौमूत्र’ असे संबोधत असल्याचं ते म्हणाले आहेत.

सेंथिलकुमार एस. यांच्या विधानावर भाजपच्या खासदारांनीही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी म्हणाल्या, हा सनातनी परंपरेचा अनादर आहे. सनातनी परंपरा आणि सनातनींचा असा अपमान देश सहन करणार नाही. डीएमके असो किंवा कोणीही असो, देशातील जनतेच्या भावनांशी खेळल्यास त्यांना जनता तोंडघशी पाडून प्रत्युत्तर देणार असल्याचं मीनाक्षी लेख यांनी स्पष्ट केलं आहे.

Rohit Pawar : ..तर संपूर्ण पक्षच भाजपबरोबर गेला असता; अजितदादांचा दावा रोहित पवारांनी खोडला

दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे हिंदीपट्ट्यातील राज्यांवर भाजपची सत्ता आली आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेसला सत्तेलाही भाजपने सुरुंग लागला आहे. याचबरोबर काँग्रेसची हिंदीपट्ट्यातील राज्यातील सत्ताही राहिलेली नाही. तेलंगणात मात्र काँग्रेसची किमया दिसली आहे. काँग्रेसने दहा वर्षांची के. चंद्रशेखर राव सत्ता हटवून हे राज्य जिंकले आहे. लोकसभेची सेमीफायनल भाजपने 3-1 जिंकली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube