Rohit Pawar : ..तर संपूर्ण पक्षच भाजपबरोबर गेला असता; अजितदादांचा दावा रोहित पवारांनी खोडला

Rohit Pawar : ..तर संपूर्ण पक्षच भाजपबरोबर गेला असता; अजितदादांचा दावा रोहित पवारांनी खोडला

Rohit Pawar : कर्जत खालापूर येथील शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. भाजपबरोबर सत्तेत जाण्याची शरद पवारांची इच्छा होती. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सत्ते जा असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी या शिबिरात केला होता. मात्र अजित पवार यांचा हा दावा शरद पवारांनी तत्काळ खोडून काढला होता. मला अनेक गोष्टी पहिल्यांदाच समजत आहेत असे पवार म्हणाले होते. त्यानंतर आता या सगळ्या घडामोडींवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केले आहे. (NCP MLA Rohit Pawar reaction on DCM Ajit Pawar allegations on NCP Chief Sharad Pawar)

अमरावती येथे रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अजित पवार आणि त्यांचा मित्रपरिवार भाजपबरोबर गेला. त्यामुळे तिकडे जाण्याची इच्छा कुणाची होती आणि कशासाठी होती हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांनी आणखी कोण कोणते खुलासे केले हे मला माहिती नाही. आता ते तिकडे गेल्यामुळे त्यांची भाषणं आम्हाला पटत नाहीत आणि समजतही नाहीत. भाजपबरोबर जाण्याचा निर्णय शरद पवारांचा असता तर आमची संपूर्ण पार्टी भाजपबरोबर सत्तेत गेली असती. पण ती तशीच आहे, असे रोहित पवार म्हणाले.

Ajit Pawar : ‘भाजपनं नाकारलं म्हणून अनिल देशमुखांनी साथ सोडली’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

काय म्हणाले होते अजित पवार ? 

शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा केली होती. शरद पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच झाला होता. 1 मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं आता सरकारमध्ये जा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. इतर कुणालाही माहिती नाही. घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं. ते राजीनामा देणार होते. तशा प्रकारे त्यांनी राजीनामा दिला. 15 लोकांची कमिटी तिथेच जाहीर केली. त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. मग सगळे आश्चर्यचकित झाले. तिथे वातावरण बदललं.

त्यानंतर आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक महिला व युवक पाहिजेत, त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या. मला हे कळलंच नाही की का? राजीनामा द्यायचा नव्हता तर नाही म्हणायचं. मग हे रोज जाऊन आंदोलनाला बसायचे. ठराविकच टाळकी होती तिथे. जितेंद्र सोडला तर एकही आमदार नव्हता तिथे. आम्हालाही कळेना. मला एक सांगतायत, तिथे एक सांगत असल्याचा खळबळजनक दावा अजित पवारांनी केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube