Ajit Pawar : आयुष्यात संघर्ष पाहिला नाही अन् निघाले संघर्ष यात्रेला; अजितदादांचा रोहित पवारांना टोला
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar ) गटाचं मुंबईतील कर्जतमध्ये शिबिर सुरू आहे. या शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. त्यामध्ये अजित पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांपासून ते रोहित पवारांपर्यंत सर्वांवरच टीका केली. यामध्ये रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेवर त्यांनी टोला लगावला आहे.
अजितदादांचा रोहित पवारांना टोला…
यावेळी रोहित पवारांना टोला लगावताना अजित पवार म्हणाले की, ज्यांना आयुष्यात संघर्ष माहिती नाही. ते संघर्ष यात्रेला निघाले आहेत. गुढघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत. असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेवरून त्यांच्यावर टीका केली आहे.
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या आगामी ‘खाशाबा’ सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात
दरम्यान सध्या रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. त्यावरून अजित पवार गटाच्या याच शिबिरात रुपाली चाकणकरांनी देखील रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवरुन निशाणा साधला होता. त्याम्हणाल्या होत्या की, अजितदादांनी जो निर्णय घेतला तो राज्याच्या विकासासाठी घेतला आहे.
‘मी साहेबांना राजी करते 10 दिवस द्या, सुप्रियाने सांगितलं होतं’; अजितदादांनी संपूर्ण कहाणीच सांगितली
मात्र मागील काही दिवसांपासून अजितदादा जे निर्णय घेताहेत त्याचं परिवर्तन आपल्यााला दिसत आहे. 18 पगड जातींचे लोकं सोबत घेऊन अजितदादांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं आहे. जनता दरबारातून जनतेचे प्रश्न सोडवले जात आहेत. मात्र, दुसरीकडे अजितदादांच्या आजारपणाचंही काही लोकांनी राजकारण केलं आहे.ज्यांना स्वत: च्या अस्तित्वाची चिंता ते आज संघर्षयात्रा काढत असल्याची टीका रुपाली चाकणकरांनी केली आहे.
तसेच यावेळी अजित पवारांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित यंदा अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. नवीन सरकार आल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी व्हावेत ही आपल्या सगळ्यांची धारणा आहे. त्यासाठी राज्यात जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या ज्या चार जागा आहेत बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या आपण लढवणारच आहोत. यासह इतर काही जागा उबाठाच्या जिथं ताकद जास्त जागा आहेत तिथं चर्चा करून जागावाटप करू. प्राथमिक चर्चा झाली होती. पण, पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पुन्हा चर्चा होणार आहे. त्यामुळे या काळात काही बातम्या आल्या तरी त्यावर विश्वास ठेऊ नका, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.