Rohit Pawar : ‘शेलार-फडणवीसांना अहंकार, कोण ‘लोणचं’ खाईल पाहू’; शरद पवारांवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर

Rohit Pawar : ‘शेलार-फडणवीसांना अहंकार, कोण ‘लोणचं’ खाईल पाहू’; शरद पवारांवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर

Rohit Pawar : 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची एक सभा अत्यंत गाजली होती. याचं कारण म्हणजे ही सभा अक्षरशः भर पावसामध्ये शरद पवार यांनी घेतली होती. ही सभा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी घेतली होती. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांनी पुन्हा भर पावसात भाषण केलं. त्यांच्या या भाषणाची जोरदार चर्चा होत असतानाच भाजप नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी खोचक शब्दांत टीका केली होती. त्यांची ही टीका शरद पवार गटाच्या नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शेलारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आशिष शेलार यांना अहंकार आला आहे. त्यांनी त्यांचा अहंकार दाखवत राहावं. आम्ही शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत राहू. आगामी निवडणुकीनंतर ते जेव्हा विरोधीपक्षात जातील तेव्हा कोण लोणचं खाईल ते आपण पाहू या असे रोहित पवार म्हणाले. त्यांच्यात थोडा अहंकार येणारच कारण केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे. 2019 च्या निवडणुकीत कुणीतरी बोललं होतं की मी पुन्हा येईन. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातही तोच अहंकार होता असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.

Aashish Shelar : वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन गावभर नाचतात? शेलारांचं टीकास्त्र

काय म्हणाले होते शेलार ? 

स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी त्यांची ही धावपळ आहे. लोकशाहीमध्ये कोणी कुठे सभा घ्याव्यात? हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना सूचना देणारी मार्गदर्शन करणे मला संयुक्तिक वाटत नाही. पण सध्याचे वर्णन करायचं झालं. तर पावसात सभा घेतल्यानंतर पुढच्या दीड वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले. त्यामुळे आता जर त्यांनी पावसात सभा घेतली. तर उरलेल्या दीड वर्षांमध्ये राष्ट्रवादी लोणच्या एवढी तरी राहील का? असा टोला आशिष शेलार यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

पवार पावसात भिजले पण निवडणूक जिंकली 

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एक सभा अत्यंत गाजली होती. याचं कारण म्हणजे ही सभा अक्षरशः भर पावसामध्ये शरद पवार यांनी घेतली होती. ही सभा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी घेतली होती. त्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे ही पावसातील सभाच श्रीनिवास पाटील यांच्या विजयाचा कारण ठरल्याचं बोललं गेलं.

रोहित पवार लोकसभा लढणार..तर जास्त तयारी करावी लागेल, विखेंचा मिश्किल टोला

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube