Aashish Shelar : वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन गावभर नाचतात? शेलारांचं टीकास्त्र
Aashish Shelar : भाजपचे नेते आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखे (Waghnakh) देशात आणण्यासाठी आज ब्रिटनला जात आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ नोव्हेंबरला वाघनखं तीन वर्षांसाठी भारतात येतील. दरम्यान, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ब्रिटिश म्युझियममधील वाघनखे हे शिवरायांचे आहेत का? असा सवाल आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केला होता.
Dhananjay Munde : संजय राऊत करमणुकीचं साधन, आम्हाला कंटाळा आलाय; मंत्री मुंडेंचा टोला
काय म्हणाले आशिष शेलार?
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकार आणणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाच्या मुद्द्यावरून घेरले आहे. त्यावर भाजपकडून त्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामध्ये आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. आशिष शेलार काय म्हणाले पाहूयात…
मलाच का बोलता? सर्वांना बोला, नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल; भुजबळांचं जरागेंना प्रत्युत्तर
‘वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले?
छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारे
आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले?
आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीय
इथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय?
महाराजांच्या पराक्रमाचेच इथे पुरावे मागतेय?
आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का?
यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात?
अहो, पब मधला थरथराट बाहेर असा कोण करतो का?
अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?’ असं ट्विट भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. दरम्यान भाजपचे नितेश राणे यांनी देखील यावरून ठाकरेंवर निशाणा साधाला होता.
वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले?
छत्रपतींंच्या वंशजांकडे पुरावे मागणारे
आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले?आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीयइथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 2, 2023
राणे म्हणाले होते की, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच नाव न घेता फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यात लिहिलं की, ज्याला मच्छर आणि मुंगी चावल्यानंतर खाजवायला दुसऱ्याची नखे वापरावी लागतात. त्याच्या पोरकट पोराकडून दुसरी काही अपेक्षाच नाही, पेहेचना कौन? असा सवाल करत राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला होता.