Dhananjay Munde : संजय राऊत करमणुकीचं साधन, आम्हाला कंटाळा आलाय; मंत्री मुंडेंचा टोला

Dhananjay Munde : संजय राऊत करमणुकीचं साधन, आम्हाला कंटाळा आलाय; मंत्री मुंडेंचा टोला

Dhananjay Munde : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी संजय राऊतांनी केलेल्या भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यामातून खेळी खेळत आहे. कारण जेव्हा ठाकरे कार्याध्यक्ष होते. तेव्हा एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या कार्यकारणीमध्ये देखील नव्हते. या आरोपाला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं. त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

राऊत माध्यमांसाठी करमणुकीचं साधन…

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. की, संजय राऊतांनी केलेल्या भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यामातून खेळी खेळत आहे. असं राऊतांचं म्हणणं आहे. त्यावर उत्तर देताना मुंडे म्हणाले की, ‘माध्यमांसाठी संजय राऊत हे करमणुकीचं साधन झालं आहे. ते सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेतात त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही.

मलाच का बोलता? सर्वांना बोला, नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल; भुजबळांचं जरागेंना प्रत्युत्तर

तसेच पुढे मुंडे म्हणाले की, माध्यमांना त्यांची प्रेस घ्यावी लागते. पण मला म्हणायचंय की प्रत्येकवेळी तेच तेच प्रश्न विचारण्यापेक्षा संजय राऊतांनी नवनविन प्रश्न विचारावित आणि मग आम्ही त्याचे उत्तरं देऊ. कारण त्याचा माध्यामांना का कंटाळा आला माहितन नाही पण आम्हाला कंटाळा आला आहे. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं आहे. त्यामुळे तेच तेच प्रश्न विचारण्यात अर्थ नाही.

Kangana Ranaut: बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ कंगनाच्या ‘तेजस’चा दमदार टीझर पाहिलात का?

त्याचबरोबर यावेळी मुंडे म्हणाले की, उद्याच्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांचे मोझॅक अळीमुळे जे नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मदत देण्यावर शासन निर्णय घेणार आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ व पीक विमा या तिहेरी मानकावर मदत केली जाणार आहे. 2021-22 च्या नुकसान भरपाई ची जी शासकीय मदत प्रलंबित आहे, ते शेतकऱ्यांना लवरच हस्तांतरित केली जाईल.

Caste Based Census Report : नितीश कुमारांचा मास्टर स्ट्रोक; जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर

तसेच 1 रुपया पीक विम्यातून जेथे शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना पीक विम्यातून अंतरिम मदत 25 टक्के मदत ही पीक विमा कंपनी कडून दिली जाणार आहे. पुढच्या पाच ते सहा महिन्यानंतर संपूर्ण राज्यात ई पंचनामे प्रक्रिया राबवली जाईल. अतिवृष्टी असो कि नैसर्गिक आपत्ती सर्वांसाठी राज्यात ई पंचनामे सुरु होईल. कापसाच्या व सोयाबीन उत्पादन खर्चाच्या 50 टक्के भाव शेतकऱ्यांना देण्यास सरकारचा प्रयत्न राहील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube