सनातन धर्म समाजासाठी ‘HIV’ सारखा : स्टॅलिन यांच्यापाठोपाठ द्रमुकच्या आणखी एका नेत्याचे विधान

सनातन धर्म समाजासाठी ‘HIV’ सारखा : स्टॅलिन यांच्यापाठोपाठ द्रमुकच्या आणखी एका नेत्याचे विधान

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरु झालेला गदारोळ अद्याप कायम आहे. अशात आणखी एक विधान वादात सापडले आहे. द्रमुकचे खासदार ए राजा यांनी आता सनातन धर्माची तुलना एचआयव्ही आणि कुष्ठरोगाशी केली आहे. तसंच ए राजा यांनी गृहमंत्री अमित शहा यांना सनातन धर्माच्या मुद्द्यावर थेट चर्चेचे आव्हान दिले आहे. (Sanatan Dharma is like ‘HIV’ for society After Stalin, another DMK leader’s statement)

ए.राजा म्हणाले की, उदयनिधी जे काही बोलले ते फारच थोडे आहे. त्यांनी फक्त मलेरिया आणि डेंग्यूचा उल्लेख केला, पण हे असे आजार नाहीत ज्यांना समाजात घृणास्पद म्हटले जाते. सनातनची व्याख्या करायची असेल तर एचआयव्ही बघा, सनातन समाजासाठी तेच काम करते.

Udhayanidhi Stalin यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्याने वादळ : ‘इंडिया आघाडीत’ ‘धर्म संकट’

पंतप्रधानांनीही सनातन धर्माचे पालन करावे आणि परदेश दौऱ्यावर जाऊ नये, असे म्हणत ए राजा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. मी पंतप्रधान आणि अमित शहा यांना माझ्याशी सनातन धर्मावर वादविवाद करण्याचे आव्हान करतो. दिल्लीत एक कोटी लोकांना बोलवा, शंकराचार्यांनाही बसवा, असे ते म्हणाले.

ए राजा यांच्या वक्तव्यावर भाजपनेही प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी म्हंटले की, उदयनिधींनंतर आता ए राजा सनातन धर्माचा अवमान करत आहेत. हे सनातन धर्माचे पालन करणाऱ्या देशातील 80 टक्के लोकांना लक्ष्य करत आहे. हिंदूंना अपमानित करून निवडणुका जिंकता येतील असे वाटत असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीचे हे वास्तव आहे.

‘सनातन’च्या समर्थनात भाजप मैदानात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना कानमंत्र

बिहारमधूनही प्रक्षोभक विधान

उदयनिधी स्टॅलिन, द्रमुकचे खासदार ए राजा यांच्यापाठोपाठ राष्ट्रीय जनता दलाचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद म्हणाले, जे टिका लावून फिरतात, त्यांनीच देशाला गुलाम केले आहे. ते म्हणाले की, टीका लावणाऱ्यांच्या काळातच भारत गुलाम झाला आहे. आज भाजप आणि आरएसएस देशाचे विभाजन करण्यात गुंतले आहेत, पण यामुळे देश चालत नाही, असाही निशाणा त्यांनी साधला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube