Udhayanidhi Stalin यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्याने वादळ : ‘इंडिया आघाडीत’ ‘धर्म संकट’
Udhayanidhi Stalin : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. भाजपने यावरून स्टॅलिन यांना तर धारेवर धरलेच. मात्र यामुळे इंडिया आघाडी धर्म संकटात अडकली आहे. कारण स्टॅलिन यांचा डीएमके हा पक्ष इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे भाजपला ही आघाडी हिंदू आणि सनातन धर्माच्या कशी विरोधात आहे. ही टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळालं आहे.
Jawan’ची नागपूर पोलिसांना भुरळ! किंग खानचा लूक शेअर करत म्हणाले, ‘जब आप ऐसे पासवर्ड…’
काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत मोठ विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, ‘सनातन धर्माला विरोध नाही तर पूर्णपणे त्याचे निर्मुलन करायला हवे. जसे आपण कोरोना, डेंगु, मलेरियाला नष्ट करतो, तसेच आपण सनातन धर्माला नष्ट केले पाहिजे.’ असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतरही स्टॅलिन आपल्या वक्तव्यावर ठाम होते.
G20 Summit : चांदीची भांडी अन् सोन्याची कटलरी; पाहुण्यांसाठी मोदी सरकारचा खास बेत
स्टॅलिन आपल्या वक्तव्यावर ठाम…
सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतरही स्टॅलिन आपल्या वक्तव्यावर ठाम होते. ते म्हणाले की, ‘मी जे काही बोललो ती गोष्ट मी पुन्हा पुन्हा बोलेन. मी फक्त हिंदू धर्माचाच नाही तर सर्व धर्मांचा उल्लेख केला होता. मी धर्मातील जातीव्यवस्थेचा निषेध करताना ते बोललो होतो, आणखी काही नाही.’
दरम्यान सनातन धर्माबद्दल केलेल वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन यांना चांगले भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. वकिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मंत्र्यांविरोधात एका वकिलाने फिर्याद दिली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्टॅलिनमुळे इंडिया आघाडीत धर्म संकट…
उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून इंडिया आघाडी धर्म संकटात अडकली आहे. कारण स्टॅलिन यांचा डीएमके हा पक्ष इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे भाजपला ही आघाडी हिंदू आणि सनातन धर्माच्या कशी विरोधात आहे. ही टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळालं आहे. तर इंडिया आघाडीत धर्म संकट निर्माण झालं आहे.
त्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने या वक्तव्यावर सामनामध्ये म्हटले की, ‘हिंदू धर्म सगळ्यात जुना आहे. पण तलवारीच्या आणि तागडीच्या जोरावर ते विकलांग करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे स्टॅलिनसारख्यांनी तोडलेले वक्तव्य अज्ञानाच्या अंधारात लूप्त झाले आहे.’ भाजपने या वक्तव्यने इंडियालाच धारेवर धरले मात्र शिवसेना हिंदुत्वावादीच आहे. अशी भूमिका ठाकरे गटाने या वक्तव्यावर मांडली. तसेच ममता बॅनर्जी, केजरीवाल आणि कॉंग्रेसने देखील या वक्तव्याता निषेध केला आहे.
कॉंग्रेसची भूमिका…
यावर आपली भूमिका स्पष्ट करताना कॉंग्रेस नेते वेणुगेपाल यांनी म्हटले की, कॉंग्रेस सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष आहे. मात्र प्रत्येक पक्षाला आपली विचारसरणी मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही सर्वांच्या श्रद्धेचा सन्मान करतो. तर कॉंग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी मात्र स्टॅलिन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर राशिद अल्वी दबी यांनी देखील स्टॅलिन यांचे वक्तव्य चुकीचे म्हणत भाजपवरही टीका केली.
आपची भूमिका…
उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्यावर आपने भूमिका मांडताना म्हटले की, भारतात सर्व जाती-धर्म आहेत त्यामुळे कोणा कोणाच्या धर्माचा अनादर करू नये. तसेच टीका टिपण्णी देखील करू नये.
तर लालू प्रसाद यादवांच्या आरजेहीने स्टॅलिन यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर म्हटले की, सनातन धर्मात अनेक विकृती आहेत. जाती व्यावस्था आहे. गटारं साफ करणाऱ्यांची जात का नाही बदलत? असा सवाल करत आरजेडीने स्टॅलिन यांना पाठिंबा दिला आहे.
दुसरीकडे अखिलेश यादवांचा समाजवादी पक्षाने मात्र या प्रकरणावर बोलणे टाळले आहे. तसेच ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने देखील स्टॅलिन यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, इंडिया आघाडीचा अशा वक्तव्यांशी काहीही संबंध नाही. असं म्हणत उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून इंडिया आघाडी धर्म संकटात अडकली आहे.
दुसरीकडे भाजप आता ‘सनातन’च्या समर्थनात मैदानात उतरले आहे. सनातन धर्माच्या वादात विरोधकांना ताकदीने युक्तिवाद करुनच प्रत्युत्तर द्यावं, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी मोदींनी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा सनातन धर्माच्या वादावर जोरदार प्रत्युत्तर द्यावं, असं मोदींनी सांगितलं. तर यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका करताना म्हटले की, हिंदूत्वाचा द्वेष यातून प्रकट होत आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीची हीच भूमिका आहे. त्यांना देशाची संस्कृती नष्ट करायची आहे.