Jawan’ची नागपूर पोलिसांना भुरळ! किंग खानचा लूक शेअर करत म्हणाले, ‘जब आप ऐसे पासवर्ड…’

Jawan’ची नागपूर पोलिसांना भुरळ! किंग खानचा लूक शेअर करत म्हणाले, ‘जब आप ऐसे पासवर्ड…’

Jawan: आज किंग खानचा (King Khan) ‘जवान’ सिनेमा सध्या सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. (Shah Rukh Khan) यामुळे सगळीकडे या सिनेमाची क्रेझ सध्या बघायला मिळत आहे. (Jawan Hindi Cinema) चाहते सिनेमा बघण्यासाठी सिनेमागृहांबाहेर जोरदार गर्दी करत आहेत. ‘जवान’ची इतकी तुफान क्रेझ आहे की, नागपूर पोलिसांना (Nagpur police) देखील त्याची भुरळ पडल्याची बघायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे नागपूर पोलिसांनी केलेलं ट्वीट.

नागपूर शहर पोलिसांनी (Twitter) त्यांच्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किंग खानच्या ‘जवान’ सिनेमाचे पोस्टर आहे. यामध्ये किंग खान तो सिनेमात साकारत असलेल्या ५ अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघायला मिळत आहे. ‘यामुळे सध्या सोशल मीडिया अकाउंट्ससाठी वेगवेगळे पासवर्ड सेट करणं असं असतं,’ असं त्या पोस्टरमध्ये सांगितले आहे.

या पोस्टरसोबत नागपूर शहर पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “जेव्हा तुम्ही असे पासवर्ड ठेवता, तेव्हा कोणताही फ्रॉडस्टर टिकू शकणार नाही.” नागपूर पोलिसांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. जवानची क्रेझ बघता नागपूर पोलिसांनी चांगलीच शक्कल लढविली आहे, आणि त्यासोबतच सायबर क्राइमविरोधामध्ये जनजागृती केल्याचे बघायला मिळत आहे.

Asha Bhosale: आशाताईंच्या सूरांनी रंगणार त्यांचा नव्वदावा वाढदिवस; दुबईत होणार ८ सप्टेंबरला सुरांची बरसात

नागपूर पोलिसांच्या या ट्वीटवर युजर्स अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत असल्याचे दिसत आहे. ‘खूप चांगलं ट्वीट’, ‘नागपूर पोलिसांबद्दल आदर आहे’, ‘नागपूर पोलिसांनी सायबर सुरक्षिततेविषयी केलेला मेसेज फार उत्तम आहे’, अशा कमेंट्स युजर्स यावर करत असल्याचे दिसत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube