Asha Bhosale: आशाताईंच्या सूरांनी रंगणार त्यांचा नव्वदावा वाढदिवस; दुबईत होणार ८ सप्टेंबरला सुरांची बरसात

Asha Bhosale: आशाताईंच्या सूरांनी रंगणार त्यांचा नव्वदावा वाढदिवस; दुबईत होणार ८ सप्टेंबरला सुरांची बरसात

Asha Bhosale: प्रसिद्ध पार्श्वगायिका ‘आशा भोसले’ यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त (asha bhosles 90th birthday) दुबईमध्ये ‘आशा@90’ या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे (Asha@90′ live music concert) नियोजन करण्यात आले आहे. ब्रॉडवे म्युझिकलच्या धर्तीवर या शोचे नियोजन करण्यात आले आहे. तब्ब्ल ३ तास आशाताई आपल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार असल्याची माहिती यावेळी मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle)


दुबईमधील (Dubai) ‘कोका कोला अरेना’ या ठिकाणी उद्या ८ सप्टेंबर २०२३ दिवशी आशा भोसले यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘आशा@90’ लाईव्ह कॉन्सर्ट या खास सांगीतिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीतील तब्बल ८ दशकांतील आशाताईंच्या सुरेल कारकिर्दीला मानवंदना देण्याचा हा एक मोठा प्रयत्न असणार आहे. या कॉन्सर्टचे आयोजक पीएमई एन्टरटेंमेंटचे सलमान अहमद यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. या संगीत सोहळ्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आशाताईंचे चिरंजीव आनंद भोसले यांनी घेतली असून संगीत संयोजन नितीन शंकर यांचे राहणार आहे.

आशा भोसले यांची गाजलेली सदाबहार गाणी, गझल आदी गाणी सादर होणार आहेत. आशा भोसले यांची नात जनाई भोसले आणि प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले त्यांना सोबस्ती राहणार असून ब्रॉडवेच्या धर्तीवर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी परेश शिरोडकर नृत्य दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. हा शो भारतात आणि देशभरात अनेक ठिकाणी वर्षभर फिरणार आहे. आशाताईंची नव्वदी अशा अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात येणार असल्याचे आनंद भोसले यांनी यावेळी माहिती दिली आहे.

Jawan Twitter Review: कसा आहे किंग खानचा ‘जवान’ सिनेमा? जाणून घ्या ट्विटर रिव्ह्यू

वयाच्या १० व्या वर्षापासून मी गाणी गायला सुरुवात केली. मी या संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत असताना आता सिनेमा संगीत क्षेत्रात असलेले अनेकजण अगदी लहान होते. प्रत्येक दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, गायक– गायिका यांच्याविषयी सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. कधी शांतपणे बसते, तेव्हा प्रत्येक गाणे, सिनेमा, त्या पाठीमागच्या आठवणी, माणसे असा सगळा पट कायम डोळ्यासमोर येत असतो. मी नव्वद वर्षांची झाले असे तुम्हाला वाटत आहे. मला मात्र सगळ्या गोष्टी अगदी काल, परवा घडल्यासारख्या कायम वाटत असतात. या इंडस्ट्रीतील पिढ्या न पिढ्या अनुभवणारी, एका मोठ्या काळाची मी एकमेव साक्षीदार आहे, असे सांगत आशाताईंनी आज देखील त्याच उत्साहाने रसिकांसमोर गाणी गाण्याचा आनंद वाटणार असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube