G20 Summit : चांदीची भांडी अन् सोन्याची कटलरी; पाहुण्यांसाठी मोदी सरकारचा खास बेत

G20 Summit : चांदीची भांडी अन् सोन्याची कटलरी; पाहुण्यांसाठी मोदी सरकारचा खास बेत

G20 Summit : राजधानी नवी दिल्लीत G20 परिषद (G20 Summit) आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या परिषदेसाठी विदेशातील पाहुणे मंडळी येणार आहेत. या पाहुण्यांचा खास पाहुणचार करण्यात येणार आहे. आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम, जेवणाचाही खास बेत तसेत खास क्रॉकरी सेट असा हटके कार्यक्रम राहणार आहे.

पाहुण्यांना सोने आणि चांदीच्या प्लेटमध्ये जेवण वाढण्यात येईल. ज्यामध्ये (G20 Summit) भारताची संस्कृती आणि वारसा यांची झलक पाहण्यास मिळेल. भांडे तयार करणारी कंपनीनुसार, कंपनी जवळपास 11 हॉटेलांत भांड्यांचा पुरवठा करत आहे. याआधी जेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा भारतात आले होते त्यावेळी त्यांना येथील जेवण आणि क्रॉकरी पसंत पडली. अमेरिकेला परत जाताना त्यांनी ही क्रॉकरी सोबत नेली होती.

Aditya L1 Mission :भारताचं पहिलं सूर्य मिशन झेपावलं! आदित्य L1 चा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू…

आयरिस कंपनीचे मालक राजीव यांनी सांगितले की मागील तीन पिढ्यांपासून आम्ही भांडी तयार करण्याचे काम करतो. या भांड्यांचे वैशिष्ट्य असे की यात संपूर्ण भारताची झलक दिसते. विदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना भारताची झलक एकाच टेबलावर (G20 Summit) दिसावी असा आमचा प्रयत्न आहे. या कंपनीची जी भांडी आहेत त्यावर जयपूर, उदयपूर, बनारस पासून कर्नाटकमधील विविध प्रकारचे नक्षीकाम दिसून येते. हे नक्षीकाम करण्यासाठी अनेक दिवस लागतात. या भांड्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मेक इन इंडिया थीमअंतर्गत येतात.

‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ नाव वापरा, मोहन भागवत यांचे आवाहन

भांडी तयार केल्यानंतर प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. त्यानंतर ज्या हॉटेलकडून जशी मागणी असेल त्या पद्धतीने भांडी डिझाईन केली जातात. या भांड्यात सगळा भारतच दिसतो. हा क्रॉकरी सेट भारतीय संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा यांचे अनोखे दर्शन घडवतो. या क्रॉकरी सेटमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी मोराचा वापर केला गेला आहे. जी 20 साठी  (G20 Summit) महाराजा थाळीचे डिझाईन आहे त्याबरोबरच दक्षिण भारतातूनही काही डिझाईन घेतले आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube