Lok Sabha Election : ‘हिंमत असेल तर वाराणसीतून मोदींविरोधात लढा’; भाजप नेत्याचं ममता बॅनर्जींना चॅलेंज !

Lok Sabha Election : ‘हिंमत असेल तर वाराणसीतून मोदींविरोधात लढा’; भाजप नेत्याचं ममता बॅनर्जींना चॅलेंज !

Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू (Lok Sabha Election) लागले आहेत. मतदारसंघांची चाचपणी आणि जागावाटपावर चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच दबावाच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. कोणत्या मतदारसंघात कुणाला तिकीट द्यायचं हे अद्याप निश्चित नाही. मात्र, इच्छुक उमेदवार सूचक शब्दांत मतदारसंघांवर दावा करू लागले आहेत. तर दुसरीकडे आव्हानाची भाषाही सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमधील भाजपा नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनाच चॅलेंज केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (PM Narendra Modi) निवडणूक लढवावी, असे आव्हान पॉल यांनी दिले. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर भाजप नेत्या पॉल यांनी मात्र ममता बॅनर्जींनाच आव्हान दिले.

Lok Sabha : बारामतीसाठी अजितदादांपाठोपाठ भाजपनंही टाकला डाव; खास व्यक्तीसाठी लावणार ताकद

जागावाटपाची चर्चा होण्याआधी ममता बॅनर्जी यांनी प्रियांका गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला. पण ममता बॅनर्जी यांनीच स्वतः हे धाडस दाखवावं. तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे ना मग तुम्हीच पंतप्रधानांविरोधात निवडणूक लढा. तुमच्यात किती हिंमत आहे हेही दिसून येईल, असे आव्हान अग्निमित्रा यांनी दिले.

काँग्रेसच्या कार्यालयाला कुलूप लावा 

यानंतर पॉल यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावरही निशाणा साधला. बंगालमधील काँग्रेसच्या कार्यालयाला आता कुलूप लावा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन बसा, असा खोचक टोला त्यांनी लगावला. काँग्रेसचे राज्यात काहीच अस्तित्व राहिलेले नाही. इंडी आघाडीचं नाव ममता बॅनर्जीच ठेवणार. पंतप्रधान कोण हे सुद्धा त्याच ठरवणार. जागावाटप 31 डिसेंबरला व्हावं हे सुद्धा त्याच ठरवणार. मग अधीर चौधरी सांगणार की आम्ही तृणमूलच्या धोरणांवर चालत नाही. त्यामुळे आता बंगालमधील जनतेनं काँग्रेसला चांगलं ओळखलं आहे, अशी टीका अग्निमित्रा पॉल यांनी काँग्रेसवर केली.

Nitish Kumar : काँग्रेसची गुगली अन् ममतांचा डाव! संयोजकानंतर PM पदाच्या शर्यतीतूनही नीतीशकुमार OUT

दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींना प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीबाबत पत्रकारांनी विचारले. त्यावर ममता म्हणाल्या, आम्ही आताच सगळं काही सांगू शकत नाही. पण बैठकीत ममता बॅनर्जी यांनी 31 डिसेंबरपर्यंत जागावाटपावर निर्णय घेण्याचं आवाहन बैठकीत केलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube