Lok Sabha : बारामतीसाठी अजितदादांपाठोपाठ भाजपनंही टाकला डाव; खास व्यक्तीसाठी लावणार ताकद

Lok Sabha : बारामतीसाठी अजितदादांपाठोपाठ भाजपनंही टाकला डाव; खास व्यक्तीसाठी लावणार ताकद

Lok Sabha Election : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीसह शिरुर, सातारा आणि रायगड लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. बारामती मतदारसंघात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) विद्यमान खासदार आहेत. त्यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट मिळेल, या शक्यतांना अधिक बळ मिळाले आहे. बारामती मतदारसंघ अजित पवार (Ajit Pawar) गटाला सोडण्याची तयारी भाजपनेही केली असून त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपाचीही यंत्रणा काम करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यानंतर आता अजित पवार गटाकडून बारामतीत कोण उमेदवार असेल इतकेच जाहीर होणे बाकी राहिले आहे.

Ajit Pawar : बारामती लढणारच! अजितदादांच्या निर्धारानं वाढलं सुप्रिया सुळेंचं टेन्शन

अजित पवार यांनी काल कर्जत खालापूर येथील शिबिरात बारामती, सातारा, रायगड आणि शिरुर जागा लढणार असल्याची घोषणा केली. रायगड वगळता बाकीच्या तीनही  मतदारसंघात सध्या शरद पवार गटाचे खासदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अजित पवार विरुद्ध शरद पवार असाच सामना होईल. परंतु, या मतदारसंघात अजितदादांचे उमेदवार कोण असतील याची चर्चा सुरू झाली आहे. बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच तिकीट मिळेल अशी शक्यता आहे. असे जर झाले तर येथे नणंद विरुद्ध भावजई अशी लढत पाहण्यास मिळेल.

बारामती भाजपाचं व्हिजन, सुरू केली तयारी 

दुसरीकडे बारामतीसाठी भाजपनेही खास प्लॅनिंग आहे. कारण बारामती भाजपाचं व्हिजन आहे. बारामती मतदारसंघात पवार कुटुंबियांचा पराभव करायचा यासाठी भाजपकडून बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. याआधीच्या निवडणूक महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना जोरदार टक्कर दिली होती. या निवडणुकीत सुळे या अतिशय कमी फरकाने निवडून आल्या होत्या. त्यामुळे या मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा पराभव करणे अशक्य नाही असा संदेश गेला. आता तर अजितदादाच विरोधात आहे म्हटल्यानंतर भाजपला बारामतीचं गणित आणखी सोपं वाटू लागलं आहे. त्यामुळे भाजपने खास प्लॅन केला आहे. जर या निवडणुकीत सुनेत्राताई पवार उभ्या राहिल्या तर त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्न करील अशी माहिती मिळाली आहे.

Lok Sabha Election : ..तर भाजपाचे 340 खासदार निवडून येतील; बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं लॉजिक

चार जागांवर ‘पवार’ विरुद्ध ‘पवार’ टक्कर 

अजित पवार पुढे म्हणाले, मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित यंदा अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. नवीन सरकार आल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी व्हावेत ही आपल्या सगळ्यांची धारणा आहे. त्यासाठी राज्यात जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या ज्या चार जागा आहेत बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या आपण लढवणारच आहोत. यासह इतर काही जागा उबाठाच्या जिथं ताकद जास्त जागा आहेत तिथं चर्चा करून जागावाटप करू. प्राथमिक चर्चा झाली होती. पण, पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पुन्हा चर्चा होणार आहे. त्यामुळे या काळात काही बातम्या आल्या तरी त्यावर विश्वास ठेऊ नका, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजितदादांचा प्लॅन बी तयार ?

पुणे जिल्ह्यात वर्चस्व मिळवण्यासाठी बारामती आणि शिरुरमध्ये आपल्या गटाचे खासदार असणे गरजेचे आहे, असे अजित पवारांचे मतद आहे. बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना तिकीट दिल्यास निवडून येण्याची शंभर टक्के खात्री नाही. कारण, दौंड, खडकवासला, इंदापूर या भागात अजित पवार यांची ताकद कमी आहे. तसेच सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली नणंद भावजय लढत होईल. यामुळे नात्यात दुरावाही येऊ शकतो. त्यामुळे या शक्यता टाळण्यासाठी अजित पवार यांनी प्लॅन बी तयार केल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या नावाचाही चर्चा होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube