INDW vs AUSW : कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय महिलांचा पराक्रम; पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला चारली धूळ
India Women Beat Australia Women 1st First Time In Test : भारतीय महिला क्रिकेट टीमने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. महिलांच्या संघाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने (INDW vs AUSW) धूळ चारली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने चौथ्या डावात 75 धावा करत सामना जिंकला. याआधी भारतीय संघाने टेस्ट क्रिकेटमध्ये कधीही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला नव्हता. आता मात्र संघाने हे यश मिळवले. याआधी इंग्लँड संघाचाही पराभव केला. या सामन्यात स्नेह राणी हीने दमदार कामगिरी केली. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार तिला मिळाला.
हरमनप्रीत कौर आणि राजेश्वरी गायकवाड या दोघींनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला फक्त 261 धावा करता आल्या. यानंतर भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी 75 धावांचे टार्गेट मिळाले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दोन विकेट गमावत उद्दीष्ट साध्य केले. स्मृति मंधानाने 38 धावा केल्या तर जेमिमा रोड्रिक्सने 12 धावा केल्या.
IND vs AUS : रोमांचक सामन्यात 6 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय, टीम इंडियाची भेदक गोलंदाजी
राणाने 22 ओव्हरमध्ये 63 धावा देत 4 विकेट घेतल्या. गायकवाडने 42 धावा देत 2 विकेट घेतल्या. चार दशकांच्या काळात भारतीय संघाने हा विस्मरणीय असा विजय मिळवला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या संघाने 219 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने 406 धावांचा डोंगर उभा केला होता. यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 261 धावा केल्या. यावेळी भारतीय संघाने गोलंदाजीत कमाल केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला जास्त धावा करता आल्या नाहीत. स्नेह राणा हीने धारदार गोलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
भारताने ऑस्ट्रेलियाला 261 धावांत गुंडाळल्यानंतर विजयासाठ 74 धावांचे लक्ष्य मिळाले होते. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने हे आव्हान दोन फलंदाज गमावत सहज पार केले. स्मृती मानधना आणि रिचा घोष यांनी दमदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 आणि दुसऱ्या डावात 261 धावा केल्या होत्या. या विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे.
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पराभव पण, दणका पाकिस्तानला! टीम इंडियाला मिळाला पहिला नंबर