Pune Lok Sabha 2024 : ‘ …तर पुणे लोकसभा निवडणूक लढवणार’; सुनिल देवधरांची घोषणा
Pune Lok Sabha 2024 : देशात काही दिवसांतच आगामी लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एनडीए आणि इंडिया आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरु असल्याचं पाहायला मिळतयं. एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठका तर दुसरीकडे दिल्लीत भाजपची बैठक झालीयं. अशातच भाजपच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदाधिकाऱ्यांना पंचसुत्रांचा उपयोग करण्याचे आदेश दिलेत. मोदींनी आदेश दिल्यानंतर आता पुण्यात उमेदवारांच्या हालचालींना वेग आलायं. पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Loksabha 2024) मला पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं भाजप नेते सुनिल देवधर (Sunil Devdhar) यांनी जाहीर केलं आहे. देवधर यांच्या घोषणेची सध्या चांगलीच सुरु झाली आहे.
‘…तर 500 खासदारांचा कार्यक्रमच आटोपला असता’; संसद घुसखोरीवरुन सुळेंचा हल्लाबोल
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या भावी उमेदवारांकडून आपापल्या मतदारसंघात चाचपणी सुरु झाल्याचं दिसतयं. अशातच आता पुणे लोकसभा मतदारसंघात सुनिल देवधर यांचा वावर वाढत आहे. देवधर सध्या लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशातच त्यांनी उमेदवारीबाबत घोषणाही केल्याने आता पुणे लोकसभा निवडणुकीसाठी देवधर यांचं नाव चर्चेत आलं आहे.
राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? शर्मिला ठाकरेंचा एकच शब्द पण, सस्पेन्स कायम
काय म्हणाले सुनिल देवधर?
पक्षाने संधी दिल्यास पुणे लोकसभा निवडणूक लढवणार, मी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळेसही प्रचंड बहुमताने पंतप्रधान बनणार आहेत. याची आम्हा सर्वांना खात्री आहे. जर पक्षाने संधी दिली तर आम्ही पक्षासाठी काहीही करायला तयार असतो, जनतेचं राजकारण करायला मला आवडेल. लोकसभेसाठी संधी दिली तर मी नाही म्हणणार नाही, असं देवधर यांनी स्पष्ट केलं आहे.
जरांगेंनी संयम ठेवावा; आझाद मैदानावरील उपोषणाच्या घोषणेवर CM शिंदेंचे आवाहन
दरम्यान, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर निवडणूक घेण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वाजवी कारण नसतांना पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ केली होती. त्यावर नाराजी व्यक्त मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या विरोधात ताशेरे ओढले होते.
Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय! महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकानिमित्त असणार खास उपक्रम
पोटनिवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानंतर पोटनिवडणुकीला न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीतच पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडणार असल्याचं दिसून येत आहे.