जरांगेंनी संयम ठेवावा; आझाद मैदानावरील उपोषणाच्या घोषणेवर CM शिंदेंचे आवाहन
Maratha Reservaition : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीडच्या इशारा सभेतून 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservaition) देण्यावर सर्व राजकीय पक्षांचे आणि सरकारचे एकमत आहे. 24 जानेवारीला सुप्रीम कोर्ट मराठा समाजाची बाजू ऐकून घेणार आहे. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये. सर्वांनी संयम बाळगावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटीशन 24 जानेवारीला ऐकून घेणार आहे. सगळ्यांना वाटत होतं की रिव्हू पिटीशन प्रमाणे फेटाळली जाईल. परंतु सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन क्युरेटिव्ह पिटीशन स्विकारली आहे. 24 तारखेला लिस्ट करण्याच्या सुचना दिल्या आहेत. हा मराठा समाजासाठी मोठा दिलासा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबईत आमरण उपोषण अन् गावाकडे ‘गनिमी कावा’, जरांगेंनी दिला कानमंत्र
24 ताररखेला क्युरेटिव्ह पिटीशनमध्ये मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी वकिलांची फौज सरकारच्या वतीने बाजू मांडेल. मागील वेळी सुप्रीम कोर्टात ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या दूर करण्याचे काम आमची वकिलांची फौज करेल. त्यातून मराठा समाजाला न्याय मिळेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा; 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार
महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे मांडले नव्हते. त्यामुळे आलेले अपयश लक्षात घेऊन परिपूर्णपणे बाजू सुप्रीम कोर्टात मांडली जाईल आणि मराठा समाजाला न्याय मिळेल. तोपर्यंत इतर सर्वांनी संयम राखणे आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टात आता प्रकरण सुरु होईल. शांतता आणि सुव्यवस्था राज्यात राखली पाहिजे. जाती जातीत तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.