मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा; 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार

  • Written By: Published:
मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा; 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकाला २४ डिसेंबर पर्यंत अल्टिमेटल दिला. मात्र, अद्याप सरकारकडून कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नसल्यानं जरांगेंनी २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. आज बीडच्या सभेत बोलतांना त्यांनी ही घोषणा केली.

मुंबईत आमरण उपोषण अन् गावाकडे ‘गनिमी कावा’, जरांगेंनी दिला कानमंत्र 

मराठा आरक्षणा देण्यासाठी जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार आहे. आज जरांगेंची बीडमध्ये सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी आपली पुढील रणनीती सांगितली. जरांगे म्हणाले, राज्य सरकार वेळ वाया घालवत असून मराठ्यांची फसवणूक करत आहे, आम्हालाही मर्यादा आहे, आमच्याकडून किती वेळ घेणार? आधी तीन महिने, नंतर चाळीस दिवस आणि आता दोन महिने लागले. शेवटी आम्हालाही मर्यादा आहे. सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने मी 20 जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषणाला बसणार आहे, असे जरांगे यांनी सांगितले.

Ole Aale Movie: नाना पाटेकर अन् मकरंद अनासपुरे यांचा अनोखा कानमंत्र 

ते म्हणाले, मराठा समाजाने शांततेत आंदोलन करत सरकारला पुरेसा वेळ दिला. आता मी आरक्षण घेतल्याशिवाय, मागे हटणार नाही. आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे. आम्हाला मुंबईत यायची हौस नाही, पण आता आमच्या लेकरांना न्याय हवा आहे. 3 कोटी मराठे मुंबईत येतील. सरकारने समंजस भूमिका घ्यावी. आमच्यावर डाव टाकू नये, असंही जरांगे म्हणाले.

मराठ्यांवर डाग लावू नका
आमच्या पोरांनी काही केलं नाही, तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. सरकारने निष्पाप मुलांना अडकवण्याचे काम केले. मराठ्यांना काही करायचंचं असतं तर त्यांनी आजच केलं असते. मराठ्यांवर विनाकारण डाग लावू नका, आणि डिवचवू नका, असंही जरांगे म्हणाले.

भुजबळांवर टीका
यावेळी त्यांनी भुजबळ यांच्यावर सडेतोड शब्दात टीका केली. येवल्याचा येडप असा ऐकेरी उल्लेख त्यांनी केली. मराठ्यांना राज्यात शांतता हवी. येवल्याचं येडपट आलं अन् त्याच्या पाहुण्यांची त्यानेच हॉटेल जाळली, असा आरोप करत माझ्या नादी लागू नको, मी लय बेकार माणूस आहे, असं जरांगे म्हणाले.

जे आमदार, खासदार मराठा आंदोलनाला पाठिंबा देत नाहीत, त्यांना यापुढे दारातही उभे करू नका, असं आवाहन जरांगेंनी केलं. आत्तापर्यंत हे आमदार, खासदार मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले. पण, आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला जे पाठिंबा देणार नाही अशा आमदारांना दारातही उभं करू नका, असं जरांगहे म्हणाले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube