आता शाळेतच शेतीही शिकविणार! पहिलीपासून कृषी अभ्यासक्रमाच्या विषयाची सुरुवात

आता शाळेतच शेतीही शिकविणार! पहिलीपासून कृषी अभ्यासक्रमाच्या विषयाची सुरुवात

रत्नागिरी : मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण होण्यासाठी आता पहिलीपासूनच कृषी अभ्यास सुरु होणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली. या अभ्यासक्रमासाठी कृषी विभाग आणि शालेय शिक्षण विभागामध्ये करारही झाला आहे, असे त्यांनी सांगितले. (Shinde government has decided to start agricultural studies from the first standard)

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रमासाठी दीपक केसरकर रत्नागिरीतील दापोली येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना शालेय अभ्यासक्रमात बदल आणि इतर बाबींबाबत माहिती दिली.

काळजीच करु नका, शिरुरमध्ये पर्याय देणार अन् निवडूनही आणणार : अजितदादांचा कोल्हेंविरोधात शड्डू

दीपक केसरकर म्हणाले, “मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण होण्यासाठी पहिलीपासून कृषी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. शिवाय पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे आपण फक्त बोलत राहतो. पण आता कृषी व शालेय शिक्षण विभागांत करार झाला आहे. त्यानुसार पहिलीपासूनच कृषी अभ्यास सुरु होणार आहे आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

कुबड्यांवर चालणाऱ्या पक्षाने 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा; सर्व्हेनंतर राऊतांचा विश्वास दृढ

शाळांच्या वेळातही बदल :

नुकतेच इयत्ता दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळांची वेळ सकाळी नऊनंतरच ठेवण्यात येईल, अशी घोषणा मंत्री केसरकर यांनी केली होती. बदलत्या जीवनशैलीमुळे सकाळी लवकर किंवा लवकर शाळेची वेळ असल्यामुळे पहाटे लहान मुलांना उठावं लागत. त्यामुळे लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. परिणामी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने लहान मुलांच्या शाळेची वेळ बदलण्यात यावी. अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube