कुबड्यांवर चालणाऱ्या पक्षाने 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा; सर्व्हेनंतर राऊतांचा विश्वास दृढ
Sanjay Raut On ABP C Voter Survey : जो पक्ष कुबड्या घेऊन उभा आहे त्यांनी 45 जागांची भाषा करावी हे हास्यास्पद असून, 45 जागा जिंकण्याचा दावा अशापक्षांनी बाजूला ठेवावा असा सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. एबीपी आणि सी व्होटर सर्व्हेच्या आखडेवारीनंतर राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर ही जिव्हारी लागणारी टीका केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मविआ किमान 35 ते 40 जागा जिंकेल, असा दावादेखील राऊतांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘अजित पवारांच बंड हे स्वार्थासाठी…’; शालिनीताई पाटलांची सडकून टीका
राऊत म्हणाले की, आतापर्यंत 28 आकडा सांगण्यात येत होता. मात्र, आता आमचा आकडाा 35 ते 40 चा आहे. आम्ही किमान 40 जागांवर लोकसभा निवडणुका जिंकू असा मला आत्मविश्वास असून, अनेक लोक येणाऱ्या काळात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचाही विश्वास राऊतांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.सर्व्हे वगैरे बाजूला ठेवा, आमचं 40 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं मिशन आहे.
उद्धव ठाकरे संपूर्ण देशाची स्वीकृती
यावेळी राऊतांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) संपूर्ण देशात स्वीकृती असून, राहुल गांधीनंतर कोणता नेते देशात असेल तर, ते उद्धव ठाकरे आहेत. आम्ही मोदी सरकारच्या तानाशाहीविरोधात खुलेपणाने मैदानात उतरणारे आहोत. अदानीच्या विरोधात आम्ही लाखोंचा मोर्चा काढला असे सांगत इंडिया आघाडीचे नेते उद्धवजींचा आदर करतात असे राऊत म्हणाले.
आंबेडकर आणि आमची भूमिका सारखीच
यावेळी राऊतांनी इंडिया आघाडीच प्रकाश आंबेडकरांच्या सहभागाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. त्यांची आणि आमचे भूमिका सारखी असून, आमच्यात नेहमी सकारात्मक चर्चा होते. कॉंग्रेसच्या स्थापना दिनानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा करू, त्यात जागा वाटपाचा निर्णय होईल. लोकशाहीची हत्या होईल असा कोणताच निर्णय प्रकाश आंबेडकर घेणार नाही. इंडियाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रकाश आंबेडकर यांना इंडियामध्ये घेण्याचं मत मांडलं होतं आणि आंबेडकरांना कोणाचाही विरोध नाही.