Ahmednagar News : शनिशिंगणापूर देवस्थानात कोट्यवधींचा भ्रष्टाचार? कारवाईसाठी आमरण उपोषण सुरु

Ahmednagar News : शनिशिंगणापूर देवस्थानात कोट्यवधींचा भ्रष्टाचार? कारवाईसाठी आमरण उपोषण सुरु

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये सुरु असलेल्या शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, प्रशासनाचा गैरवापर यावर आळा घालण्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करा. हे देवस्थान सरकार जमा करावं आणि याठिकाणी त्वरित प्रशासक नेमण्यात यावा. अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे.

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या नावाखाली 8 हजार कोटींचा घोटाळा; उद्धव ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप

दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता सुरु झालेल्या या उपोषणात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, अशोक टेमक, बेल्हेकरवाडीचे सरपंच भरत बेल्हेकर, कांगोणीचे माजी सरपंच बंडू भाऊ शिंदे, सतीष गडाख संदीप कुसळकर, प्रतिक शेजूळ, सचिन भांड, अमोल साठे, प्रताप चिंधे, नानासाहेब ढेरे, संदीप दरंदले, संभाजी गडाख, अरुण चांदघोडे, भाऊसाहेब बेल्हेकर, गणेश चौघुले, कुशीनाथ ढेरे, ज्ञानदेव ढेरे, संभाजी राशिनकर, प्रकाश ढेरे, बाळा साबळे, हर्षद शिरसाठ आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

जाणून घ्या प्रकरण…

शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये विश्वस्त मंडळाच्या परवानगीने कोट्यावधीचा भ्रष्ट्रचार व अनधिकृत कामगार भरती, अनधिकृत बोगस विश्वस्त मंडळ बरखास्त करून त्वरीत प्रशासकाची नेमणूक केली जावी यामागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे व अशोक टेमके यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान याप्रकरणी त्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालय अहमदनगर, पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन, तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

‘विरोधात कुणीतरी लढलंच पाहिजे..,’; ‘बारामती लढवणार’ म्हणणाऱ्या दादांना ताईंचं उत्तर

कोट्यवधींचा भ्रष्टाचाराचा आरोप

शेटे यांनी दिलेल्या निवेदनात आमदार गडाखांवर देखील आरोप केले आहे. शंकरराव गडाख यांनी अनधिकृत भरती केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसेच शनी शिंगणापुर देवस्थान येथे दर्शन पावतीमध्ये २ कोटींचा भ्रष्ट्राचार करून अनेक खाजगी शिक्षण संस्था घेतल्याचाही आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करून ताबडतोब प्रशासक नेमणूक करण्यात यावी. तसेच बोगस कामगार भरती, याची चौकशी करून समितीची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता या भ्रष्ट्रचाराच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले असल्याचे शेटे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज