भाविकांसाठी मोठी बातमी! शनिशिंगणापूरमधील शनिदर्शन आजपासून भुयारी मार्गाने…
Shani Shingnapur : जगविख्यात असलेलं अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर (Shani Shingnapur)येथील शनि भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शनिशिंगणापूर येथील देवस्थानात दर्शनासाठी जाणारा भुयारी मार्ग आजपासून (दि.22) भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. या भुयारी मार्गामुळे मंदिर प्रवेशद्वारासमोरील वाहतुकीची गर्दी कमी होणार आहे. शनि मंदिर प्रवेशद्वाराकडे येणारा भुयारी मार्ग अडीचशे मीटरचा असून, प्रवाशांसाठी खुला झाल्याने भाविकांना चांगली सुविधा प्राप्त झाली आहे.
Nagar Urban Bank : ठेवीदार संतापले…थेट माजी खासदाराच्या बंगल्यावरच निषेध मोर्चा
दर्शनासाठी असा असणार भुयारी मार्ग :
शनिशिंगणापूर येथे मोठ्या संख्येने भाविक हे दर्शनासाठी येत असतात. दरम्यान भाविकांना सोईस्कर रित्या शनिदर्शन घेता यावं, यासाठी आजपासून (दि.22) दर्शन मार्गात बदल करण्यात आला आहे. आजपासून सुरू झालेल्या नव्या भुयारी मार्गामधून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुख्य दर्शन मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच भाविकांनी या नव्या भुयारी मार्गाचा अवलंब करावा, असं आवाहन शनैश्चर देवस्थान प्रशासनाने केलं आहे.
“सिंघानियांनी अत्याचार केले, पण अंबानींमुळे वाचलो” : नवाज मोदींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
पानस नदी सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत शनि मंदिराच्या समोरील बाजूस 55 कोटींची विकास कामं सुरू आहेत. शनिशिंगणापूर येथे पानसतीर्थ प्रकल्पाची (Panastirtha project)कामं अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या अंतर्गत तब्बल तेरा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भुयारी मार्ग भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे.
दरम्यान महाद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम भेटीचं शिल्प उभारण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. त्यामुळे महाद्वारासमोरील सध्या सुरू असलेला मुख्य मार्ग बंद करण्यात आला आहे.
भव्यदिव्य दर्शन मार्गाचा हा प्रकल्प सुरू होत असताना उद्घाटनाआधीच या रांगेतून भाविकांना दर्शनासाठी पाठवले जात आहे. विविध कामं झाल्यानंतर येत्या काही दिवसांत दर्शनरांग पानसतीर्थ प्रकल्पाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली आहे.