Nagar Urban Bank : ठेवीदार संतापले…थेट दिवंगत दिलीप गांधींच्या बंगल्यावरच निषेध मोर्चा

Nagar Urban Bank : ठेवीदार संतापले…थेट दिवंगत दिलीप गांधींच्या बंगल्यावरच निषेध मोर्चा

Nagar Urban Bank : नगर अर्बन बँकेच्या(Nagar Urban Bank) ठेवीदारांनी ठेवी परत मिळाव्यात यासाठी आज बँकेचे व्हाईस चेअरमन असलेले माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी सुरेंद्र गांधी यांनी ठेवीदारांशी संवाद साधत बँक वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे व आपल्या ठेवी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, संवाद साधताना ठेवीदारांनी सुरेंद्र गांधी यांच्यासमोर संताप व्यक्त केला आहे.

मराठवाड्याच्या पाण्याचे आंदोलन तापले; गायकवाड थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडकले!

अहमदनगरमधील नगर अर्बन बॅंकेवर अखेर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने(RBI) कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नगर अर्बन बॅंकेची मान्यता रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. बँकेवर अवसायकाची नियुक्ती करण्याचे आदेश केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांना आणि केंद्रीय सह निबंधकांनी दिले आहेत.

आरबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी हे आदेश काढले आहेत. बँकिंग व्यवसाय करण्यासाठी अर्बन बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या संधी नाहीत. यामुळे बँकिंग नियमन कायदा १९४९ चे कलम ५६ सह कलम ११ (१) आणि कलम २२ (३) (ड) च्या तरतुदींचे पालन होत नाही. बँक चालू ठेवणे तिच्या ठेवीदारांच्या हितावह नाही.

Video : मला कुणी रोखू शकत नाही; AIMIM च्या फायरब्रांड नेत्याची भरसभेत पोलिसाला धमकी

बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता ती सध्याच्या ठेवीदारांना ठेवींच्या पूर्ण रकमा देऊ शकत नाही, तसेच बँकला व्यवसाय पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिल्यास त्याचा सार्वजनिक हितावर विपरीत परिणाम होईल. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेचा परवाना रद्द केल्यामुळे बँकेला बँकिंग व्यवसाय करण्यास मनाई करण्यात येत आहे. त्यामध्ये ठेवी स्वीकारणे किंवा ठेवींची परतफेड करणे याचा समावेश आहे.

आरबीआयने कारवाई केल्यानंतर आता ठेवीदारांना अद्यापही ठेवी परत न मिळाल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी निषेध मोर्चा काढला आहे. यावेळी आमच्या ठेवी परत द्या, असा एकच सूर ठेवीदारांनी लावला होता.

फलंदाजांना मिळणार फुकटात 5 धावा, आयसीसीने जाहीर केला ‘स्टॉप क्लॉक’ नियम

सुरेंद्र गांधी म्हणाले :
ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. ही बॅंक ऐतिहासिक आहे, त्यामुळे बॅंक सुरु करण्याची विनंती आम्ही सहकार खात्याकडे केली आहे. बॅंकेच्या कारवाईवर स्टे ऑर्डर मिळावी अशी मागणी केली आहे विरोधकांनी एखादी संस्था काढावी ती टिकून चालवून दाखवावी. विरोधकांनी 400 लोकांच्या रोजगारावर कुर्हाड घालण्याचं काम केलंयं. संस्था चालवू शकत नाही तर संस्था चालवणाऱ्यांना चालवू द्या, संस्था अडचणीत कशी आणता येईल असं विरोधकांनी काम केलं असल्याचा आरोप गांधी यांनी यावेळी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube