मराठवाड्याच्या पाण्याचे आंदोलन तापले; गायकवाड थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडकले!

मराठवाड्याच्या पाण्याचे आंदोलन तापले; गायकवाड थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडकले!

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या (Marathwada) हक्काचे 8.6 टीमएमसी पाणी सोडण्यासाठीच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. हे पाणी सोडण्यासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिलेली नाही, तरीही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या दबाला बळी पडून सरकार पाणी सोडण्याचा निर्णय घेत नाही, नाशिकचे (Nashik) अभियंता पाणी सोडण्यासाठी टाळाटाळ करत आहेत, असा आरोप करत मराठवाडा बहुजन विकास आघाडीने मराठवाडा गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी कार्यालयावर शाईफेक करत संताप व्यक्त केला. (Marathwada Bahujan Vikas Aghadi, a protest was held in front of the Marathwada Godavari Irrigation Office)

मराठवाड्याच्या हक्काचे 8.6 टीमएमसी पाणी सोडण्यासाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. हे पाणी सोडण्यासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील नेत्यांचा विरोध आहे. मात्र मराठवाड्याच्या हक्काचे 8.6 टीएमसी पाणी सोडावे यासाठी तीन दिवसांपुर्वी मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्यावतीने रमेश गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी हक्काचे 8.6 टीएमसी पाणी तर सोडाच, पण 50 टीएमसी पाणी देण्याचा निर्णयही तात्काळ घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा इशारा दिला होता.

Eknath Khadse : ‘मराठा समाजाला दिलेला शब्द पाळा’; खडसेंनी फडणवीसांना घेरलं

पण तीन दिवसांनंतरही हा निर्णय न झाल्याने गायकवाड यांच्या नेतृत्वात बहुजन विकास आघाडीने छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठवाडा गोदावरी पाटबंधारे कार्यालयावर दुपारी धडक दिली. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त आंदोलकांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी सोबत आणलेल्या डब्यातील शाई प्रवेशद्वारावर फेकत निषेध व्यक्त केला. यावेळी शाईफेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीशी झटापटही झाली.

HBD Kartik Aaryan: केक कापण्यापूर्वी कार्तिक आर्यनने ‘ही’ खास इच्छा केली व्यक्त, म्हणाले…

गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलेल्या निवेदनात काय म्हटले?

गोदावरी नदीमधील 81 टीएमसी पाणी मराठवाडा, 115 टीएमसी पाणी नाशिक-नगरला देण्याचे सूत्र आहे. असे असतानाही नगर-नाशिकने मराठवाड्याच्या हक्काच्या 50 टीएमसी पाण्यावर 165 टीएमसीची धरणे बांधली आहेत. ही धरणे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे व राजकीय नेत्यांच्या दबावाखाली बांधले गेले आहेत. मराठवाड्यात 40 लाख हेक्टर शेती कोरडवाहू आहे. कोरडवाहू शेतीमुळे 6 ऑक्टोबर 1975 पासून आजपर्यंत सुमारे 60 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. लाखो लोकांनी उदरनिर्वाहासाठी स्थलांतर केले आहे. त्यामुळे आता मराठवाड्याच्या हक्काचे 8.6 टीमएमसी पाणी तर सोडाच, पण 50 टीएमसी पाणी देण्याचा निर्णयही तात्काळ घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु, असा इशारा दिला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube