Ahmednagar News : आमचा फराळ गोड पण साखर विकतची, आमचे कारखाने नाही; शिंदेंचा विखेंना टोला

Ahmednagar News : आमचा फराळ गोड पण साखर विकतची, आमचे कारखाने नाही; शिंदेंचा विखेंना टोला

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News) सध्या दिवाळी फराळावरून चांगलेच राजकीय फटकेबाजी पाहायला मिळत आहे. आमदार निलेश लंके व भाजप आमदार राम शिंदे यांनी आपापल्या मतदार संघात दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. दरम्यान याच कार्यक्रमात आमदार शिंदे यांनी खासदार सुजय विखे यांना शाब्दिक टोला लगावला आहे. आमच्या दोघांचाही फराळ हे गोड होता. साखर आम्ही विकत आणलेली होती आमच्या दोघांचेही साखर कारखाने नाहीत, अशा शब्दांत आमदार राम शिंदे यांनी आपल्याच पक्षाचे खासदार सुजय विखे यांचा नामोउल्लेख टाळत त्यांना शाब्दिक टोला लगावला आहे.

Manoj Jarange माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नको; भुजबळांचा जरांगेंना थेट इशारा

दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या फराळ कार्यक्रमाला आमदार राम शिंदे यांच्या चौंडी या ठिकाणी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी भेट दिली. तर संध्याकाळी हंगा या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आयोजित केलेला फराळ कार्यक्रमास भाजपचे आमदार राम शिंदे व कोपरगाव चे युवा नेते विवेक कोल्हे यांनी भेट देऊन सदिच्छा शुभेच्छा दिल्या.

मराठा व्होट बँक, भुजबळांचं एकमुखी नेतृत्व अन् फडणवीसांसोबतचा वाद : पंकजांची जालन्याकडे पाठ!

दरम्यान आगामी काळात राज्यात निवडणुका होणार आहे. दरम्यान दिवाळीचा सणउत्सव सुरु असल्याने जिल्ह्यात यंदाच्या दिवाळीला राजकीय फराळाच्या चर्चा चांगल्या रंगू लागल्या आहे. यातच नेतेमंडळी फराळाच्या ठिकाणी भेटीदेत चांगलेच राजकीय फटकेबाजी करताना दिसून येतआहे. भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांनी हांगा येथे लंके यांच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमादरम्यान चांगलीच राजकीय फटाके फोडले.

Pune Drug Case: ललित पाटील प्रकरणी दोन पोलिसांना अटक, हलगर्जीपणा भोवला

यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले, आमच्या दोघांचाही फराळ हे गोड होतं साखर आम्ही विकत आणलेली होती आमच्या दोघांचेही साखर कारखाने नाहीत असं नाव न घेता खासदार सुजय विखे यांना टोला लगावला. अधिकृत महायुतीची घोषणा झाली आणि त्यानंतरच आम्ही दोघं एकत्र दिसलो याआधी कधी आम्ही एकत्र आलो नाही. मात्र अनेकांना असं वाटत कि हे दोघे एकत्र कसे आले. जसे बाकीचे एकत्र आलो तसे आम्ही एकत्र आलो. मी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो आहे.

आपण एकमेकांच्या सुखदुःखात गेले पाहिजे, कोणाला काय अर्थ काढायचा तो त्यांनी काढावा. दिवाळी फराळात आमचा फराळ गोड होता तुमचा देखील फराळ गोडच असुद्या. सगळं काही गोडच मग अडचण काय आहे असा शब्दात त्यांनी विखेंवर चांगलाच हल्लाबोल केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube