Manoj Jarange माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नको; भुजबळांचा जरांगेंना थेट इशारा

Manoj Jarange माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नको; भुजबळांचा जरांगेंना थेट इशारा

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर आज ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच यावेळी त्यांनी इशारा देखील दिला की, माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नको. असं म्हणत भुजबळांनी जरांगेंना इशारा दिला. मराठा आरक्षणाला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. तो विरोध दर्शवण्यासाठी आज ओबीसी समाज एकवटला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मेळावा घेतला आहे. त्यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे नेते जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नको…

भुजबळ जरांगेंना इशारा देताना म्हणाले की, न्यायमुर्ती जरांगेंना सर म्हणत होते. पण त्याला सर म्हणायला तो पाचवी पास तरी आहे का? याद राख माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नको. तसेच मी ओबीसींच्या हक्कासाठी घेतलेला हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. असे मेळावा मी प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मिळावे झाले पाहिजे ओबीसींची संख्या जास्त असून महाराष्ट्रात देखील ताबडतोब जातिय जनगणना झाली पहिजे. अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

Pune Drug Case: ललित पाटील प्रकरणी दोन पोलिसांना अटक, हलगर्जीपणा भोवला

मराठा आरक्षणाला विरोध करताना गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये एकमेकांवर टीका टीपण्णी सुरू आहे. त्यात ते म्हणाले की, जरांगे मला विचारतात की, मी कुणाचं खातो? अरे मी काय तुझं खातो का? हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही. असे छगन भुजबळ म्हणाले. तेसेच ते पुढे म्हणाले की, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये. 56 मराठी मोर्चे पण आम्ही कुणालाही विरोध केला नाही. तसेच आम्ही कुणाची घरं दारं देखील जाळली नाहीत.

भुजबळांना सरकारचा पाठिंबा आहे का? नसल्यास तात्काळ हकालपट्टी करा! संभाजीराजे छत्रपती संतापले

ओबीसी आरक्षणावर प्रश्न उपस्थित करता पण ओबीसीतील सर्व जाती या कायद्याने आल्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला गरिबी हटाव मोहिमेसारखी वागणूक देऊ नका. तसेच मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये अवैधरित्या घुसतो आहे. असे छगन भुजबळ म्हणाले. ईडब्लूएसमध्ये मराठा समाजाला जो लाभ मिळाला तो ओबीसींना देखील मिळालेला नाही. मराठा समाजाला 10-11 कोटी मिळतात. मात्र ओबीसी समाजाला हजार कोटी मिळत नाहीत तर मराठा समाज 85 टक्के मराठा समाज ईडब्लूएसचा लाभ घेतोय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube