Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या नावाखाली 8 हजार कोटींचा घोटाळा; उद्धव ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray : अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra)शेतकऱ्यांचं (Farmers)मोठं नुकसान झालं आहे. त्यातच हिंगोलीच्या (Hingoli)कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपलं स्वत:च्या शरीराचे अवयव विक्रीला काढले आहेत. शेतकऱ्यांनी आपली किडनी, लिव्हर, डोळे विकण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपासून हे शेतकरी मुंबईमध्ये (Mumbai)गेले आहेत. आज शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची भेट घेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारने पीक विमा योजनेच्या माध्यमातून 8 हजार कोटी रुपयांचा घोटाळा (8000 crore scam)केल्याचा आरोप केला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde)हे नेमकं काय उत्तर देणार? हे पाहावे लागणार आहे.
Ajit Pawar : आयुष्यात संघर्ष पाहिला नाही अन् निघाले संघर्ष यात्रेला; अजितदादांचा रोहित पवारांना टोला
राज्य सरकारने आपले अवयव विकत घेऊन कर्जमाफी करावी, अशी मागणी हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी केली आहे. हे शेतकरी मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर या शेतकऱ्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर पीक विमा योजनेच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा केला.
महाराष्ट्राच्या अलौकिक संत पंरपरेचा इतिहास उलगडणार, ’मुक्ताई’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज
यावेळी हिंगोलीचे शेतकरी म्हणाले की, शेतकरी अडचणीत असताना, कर्जबाजारी असताना दुसरं काही विकायला नसल्याने स्वतःचे अवयव विकण्यासाठी आम्ही मुंबईत आलो आहे. सध्याचं सरकार शेतकऱ्यांच्या नावावर राज्य करत आहे. ते शेतकऱ्यांना अटक करत असतील तर मी या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन उद्ध्वस्त झाला. बोंड अळीमुळे कापूस उद्ध्वस्त झाला.
दोन चार कोटी शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल तर, सरकार त्याला भाव द्यायला अजिबात तयार नाही. पेरणीसाठी बँकांकडून कर्ज काढलं. आता हे पीककर्ज भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. आमची जमीन, घर बँकेकडं गहाण आहे. त्यामुळं आम्ही आमचे अवयव विकायला काढले आहेत.
75 हजार रुपयांमध्ये आम्ही लिव्हर, 90 हजार रुपयांमध्ये किडनी आणि 25 हजार रुपयांमध्ये आम्ही डोळे गहाण ठेवले आहेत. आमचे जास्तीत जास्त तीन लाखांचं शेतकऱ्यांचं कर्ज आहे. सरकारने हे अवयव विकत घ्यावेत आणि आमची कर्जफेड करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आम्हाला फक्त सहानुभूती नको, सरकारने आम्हाला दडपवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला गाडीत बसवलं. पण कुठे चाललो हे काही सांगितलं नाही, असेही यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.