Uddhav Thackeray : ‘राजा मस्त, प्रजा त्रस्त गद्दार हृदयसम्राटांनी निवडणुकीत’.. ठाकरे गटाचा CM शिंदेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : ‘राजा मस्त, प्रजा त्रस्त गद्दार हृदयसम्राटांनी निवडणुकीत’.. ठाकरे गटाचा CM शिंदेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : तेलंगाणात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गेले होते. यावरून ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सीएम शिंदेंवर जळजळीत टीका केली आहे. तेलंगणा व जयपुरातील निवडणुकीत (Telangana Elections) भाजपा उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम राज्यातील गद्दार हृदयसम्राटांना देण्यात आले होते. निवडणुकांत खोके पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या गद्दार हृदयसम्राटांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानेच पुसली. कटकारस्थाने करून सत्तेवर आलेला नीरो रोम जळत असताना फिडल हे वाद्य वाजवत बसला होता आणि अवकाळीच्या संकटात शेतकरी उद्धवस्त झाला असताना महाराष्ट्राचे आधुनिक नीरो निवडणूक प्रचारात रमले आहेत. राजा मस्त आणि प्रजा त्रस्त शेतकरी बेजार आणि सरकार पसार अशी जळजळीत टीका सामनातून ठाकरे गटाने केली आहे.

Uddhav Thackeray : आता जुगार बचावो मंत्रालय तर सुरू होणार नाही ना? ठाकरे गटाचा खोचक टोला

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गारपिटीने कहर केला असून मायबाप सरकार राज्यातून पसार झाले आहे. संकटात सापडलेल्या जनतेला आधार देण्यासाठी सरकार असते म्हणून त्यास मायबाप म्हणायचे. पण, महाराष्ट्रात उलटेच चित्र आहे. पावसाळ्यात झाले नाही असे विजांचे तांडव, ढगांचा भयंकर गडगडाट, तुफानी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने राज्याच्या अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले. अनेक जिल्ह्यातील शेती व शेतमाल उद्धवस्त झाला. फळबागांची भयंकर हानी झाली. त्यामुळे हतबल झालेल्या हजारो शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्यातील मिंधे सरकार इतर राज्यांतील निवडणूक प्रचारात मश्गूल आहे. अशा सत्ताधाऱ्यांना मायबाप कसे म्हणणार असा संतप्त सवाल ठाकरे गटाने केला आहे.

आता सरकारी पोपट काही बोलत नाहीत 

राज्यातील शेतकऱ्यांनी निसर्गाचे असे काय घोडे मारले आहे कळत नाही. पण गेली काही वर्षे सातत्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतो आहे. ऐन पावसाळ्यात अवर्षणामुळे दुष्काळी परिस्थिती आणि पावसाळा संपल्यावर मात्र अवकाळी पाऊस व गारपिटीचे तडाखे असे दुहेरी संकट कोसळत आहे. या सततच्या आपत्तींचा महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. सततच्या या संकटांमुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी खचला आहे. कधी सुदैवाने निसर्गाने साथ दिली आणि बंपर उत्पन्न झाले तर नेमके तेव्हाच या शेतमालाचे भाव कोसळतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशा बाता सरकार मारते. पण शेतकरी खरोखरच उत्पादन वाढवतो तेव्हा त्याच्या हाती काहीच उरत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यावर सरकारी पोपट काही बोलत नाही.

Uddhav Thackeray : ‘आता ठाणेकरच गद्दारांना धडा शिकवतील’ उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज