Download App

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला दणका बसणार : तीन बडे नेते BRS च्या वाटेवर

अहमदनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आता अहमदनगर जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यातील ३ बडे नेते सध्या बीआरएसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर जिल्ह्यात सध्या कंबर कसायला सुरुवात केली आहे. तिथे राष्ट्रवादीचे रौप्य महोत्सवी वर्षही साजरे होणार होते. मात्र पावसाआभावी ही सभा रद्द करण्यात आली. अशात राष्ट्रवादीला नगर जिल्ह्यात गळती लागल्याचे चित्र आहे. (Ahmednagar NCP leaders on the way join Chandrashekhar rao BRS party)

भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर असलेल्या तीन नेत्यांपैकी एक नेता थेट हैदराबादला पोहोचला आहे. हा नेता चंद्रशेखर राव यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. तर दुसरा नेता राष्ट्रवादीचा बडा पदाधिकारी असून त्याच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे. हा नेता आधी रयत शिक्षण संस्थेवर होता. मात्र त्या पदावरून काढण्यात आल्याने हा नेता नाराज असल्याचे बोलले जात आहे. कर्जत बाजार समितीमध्ये भाजपचा सभापती झाल्याने गद्दारीच्या नाट्यावरून देखील हा नेता सध्या वादात सापडला आहे.

‘जुनी जाहिरात आमची नाही पण, नवी जाहिरात आम्हीच दिली’; देसाईंनी सांगतिलं खरं कारण

तिसरा नेता हा पाथर्डी तालुक्यातील असून आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यानेच हा नेताही बीआरएसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. पाथर्डीमधून सध्या माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. त्यामुळे आगामी राजकीय पर्यायाची तयारी करण्यासाठी पाथर्डीमधील राष्ट्र्वादीचा हा नेता भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सेना-भाजपच्या युतीत काड्या करणार शकुनी मामा कोण?; राणेंचा रोख नेमका कुणाकडे

घनश्याम शेलार पोहचले थेट हैदराबादला :

घनश्याम शेलार हे थेट हैदराबादला पोहोचले आहेत. श्रीगोंदा विधानसभ मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी ही राहुल जगताप यांनाच मिळणार असल्याची ठाम समजूत शेलार यांची झाली असल्याने त्यांनी नवा पर्याय स्वीकारण्याची तयारी दाखवल्याचे बोलण्यात येत आहे. राहुल जगताप यांची अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भूमिका वादग्रस्त ठरूनही पक्ष त्यांनाच उमेदवारी देत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. यामुळे आगामी राजकीय वाटचाल डोक्यात ठेवून शेलार भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Tags

follow us