NCP News : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका या होणार आहेत (Lok Sabha Election) त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये (NCP News) पडलेल्या फुटीनंतर आता शरद पवार गट देखील निवडणुकांच्या दृष्टीने पाऊले टाकू लागला आहे. यातच नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 3 आणि 4 जानेवारी रोजी शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिबीर पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे दोन दिवस शिर्डीमध्ये येणार आहेत. लोकसभेच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वाचे असून निर्णय देखील होण्याची शक्यता असल्याने आहे. शरद पवार स्वतः दोन दिवस शिर्डीतच थांबणार आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.
जिल्ह्यातील शिर्डी ते सध्या एक राजकीय केंद्रबिंदू बनू लागले आहे. बडे नेतेमंडळी तसेच पदाधिकारी यांची शिर्डीमध्ये जाहीर सुरूच असते. यातच गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिर्डीकडे राजकीयदृष्ट्या चाचपणी सुरू केली असून राजकीय गणिते जुळवाजुळव सुरू आहे. राष्ट्रवादीने देखील पावले टाकण्यास सुरुवात केली असून राष्ट्रवादीचे दोन दिवसीय शिबिर हे शिर्डीमध्ये पार पडत आहे. या शिबिराला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक बडे नेते उपस्थित राहणार असून याला प्रामुख्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत.
Sharad Pawar’s Birthday Special: शरद पवारांचे राजकारण आणि कौटुंबिक संबंध याचा आढावा |LetsUpp Marathi
शिबिराबाबत माहिती देताना आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीमध्ये दोन दिवसीय शिबिर पार पडणार असून दोन हजारांहून अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. पक्ष संघटना बांधणीसाठी यावेळी काही महत्त्वाचे निर्णय देखील घेतले जाणार आहेत.
नगर जिल्ह्यात अजितदादांचं पारडं जड
नगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो राष्ट्रवादीचे सहा आमदार जिल्ह्यातून निवडून आले होते. दरम्यान राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटात चार आमदार गेले तर दोन आमदार हे शरद पवार गटामध्ये राहिले. यातच आगामी काळात असलेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने आता खुद्द शरद पवार हे मैदानात उतरले असून पुन्हा एकदा त्यांनी नगर जिल्ह्याकडे आपलं लक्ष केंद्रित केले आहे. सध्या तरी नगर जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार यावर काय तोडगा काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Sharad Pawar birthday: शरद पवारांची सुरूवातच भावाचा पराभव करून झाली; तेथे पुतण्याचे काय?