Download App

Ahmednagar News : धक्कादायक! प्रेमसंबंधातून सातवीच्या मुलीने दिला मुलाला जन्म; नगर जिल्ह्यातील प्रकार…

  • Written By: Last Updated:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क एका सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने प्रेमसंबंधातून एका मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काँग्रेस नेते सुनील केदार अडचणीत! नागपूर जिल्हा बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात दोषी

याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील पीडित मुलगी ही एका आश्रम शाळेत शिक्षण घेत होती. ती इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असताना तिची ओळख आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका मुलाशी झाली. हळूहळू ओळखीचे मैत्रीत व नंतर प्रेमात झाले होते. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असताना या दोघांनी तेथून पळ काढून थेट पाहुण्यांचे घर गाठले तिथे ते राहिले व त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित झाले.

Oscar 2024 मधून ‘2018 : एव्हरीवन इज हिरो’ बाहेर; एकाही भारतीय चित्रपटाला नामांकन नाही, चाहते नाराज

जून 2023 मध्ये पीडित मुलगी आईच्या घरी गेली असता मुलीला मळमळ होऊ लागली होती. आईने तिच्याकडे चौकशी केली असता, या मुलीने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तिला रुग्णालयात नेले असता ती प्रेग्नेंट असल्याचे समोर आले. यामुळे या दोघांचा साध्या पद्धतीने विवाह देखील पार पडला. आता या मुलीने बाळाला जन्म दिला. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी मुलगा अल्पवयीन आहे.

लग्न झाले असले तरी बालविवाह गुन्हाच…

दोघांनी शिक्षण घेण्याच्या वयातच संसाराचे स्वप्न पहिले. शिक्षणाला फाटा देत त्यांनी संसाराचा गाडा ओढण्यासाठी जवळीक साधली व लग्नही केले. मात्र बालविवाह हा शेवटी गुन्हाच आहे. दोघांनी लग्न केले असले तरी त्याला कायद्यात आधार नाही. त्यामुळे, पीडित मुलीची फिर्याद घेण्यात आली आणि त्यानुसार अत्याचाराचा गुन्हा पुणे ग्रामीणला नोंदविण्यात आला आहे. मात्र, घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हाद्दीत घडल्यामुळे तो गुन्हा इकडे वर्ग करण्यात आला आहे.

Tags

follow us