Oscar 2024 मधून ‘2018 : एव्हरीवन इज हिरो’ बाहेर; एकाही भारतीय चित्रपटाला नामांकन नाही, चाहते नाराज

Oscar 2024 मधून ‘2018 : एव्हरीवन इज हिरो’ बाहेर; एकाही भारतीय चित्रपटाला नामांकन नाही, चाहते नाराज

Oscar 2024 : अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांच्याकडून ऑस्कर 2024 (Oscar 2024) साठी नामांकन मिळालेल्या चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे, मात्र यामध्ये भारतीय चित्रपट चाहत्यांसाठी त्यासाठी नाराजीची बातमी समोर आहे. कारण यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी एकाही भारतीय चित्रपटाला नामांकन मिळाले नाही.

दिल्लीतील नेत्यांशी आमचे संबंध मधूर; 23 जागाचं लढवणार, राऊतांनी ठासून सांगितलं

अकॅडमीकडून ओरिजनल सॉंग्ज, डॉक्युमेंटरी पिक्चर, इंटरनॅशनल फिचर, ओरिजनल स्कोर यासह दहा कॅटेगरीमध्ये चित्रपटांच्या नामांकराची घोषणा करण्यात आली. यामध्ये बार्बी, ओपन हायमर आणि किलर्स ऑफ द फ्लावर मून यांना स्कोर आणि साऊंड सह अनेक कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले आहेत.

Manoj Jarange : ‘नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नका, आरक्षण घेतल्याविना’..; जरांगेंचा स्पष्ट इशारा

दरम्यान भारतीय चित्रपटांमधून मल्याळम चित्रपट ‘2018 : एव्हरीवन हिरो’ हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. मात्र हा चित्रपट देखील ऑस्करच्या नामांकनामध्ये स्थान मिळवू शकला नाही. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र असं पहिल्यांदाच झालं नाहीये की एकही भारतीय चित्रपट ऑस्करसाठी निवडला गेलेला नाही. या अगोदर देखील मल्याळम चित्रपट गुरु (1997) ‘एडमिन्टे माकन अबू’ (2011) आणि ‘जल्लीकट्टू’ (2019) या चित्रपटांना देखील ऑस्करसाठी नोंदवण्यात आलं होतं. मात्र त्यांना देखील नॉमिनेशन मिळू शकलं नव्हतं. तर यावर्षी मल्याळम चित्रपट 2018 या चित्रपटाला ऑस्करमधून बाहेर पडावे लागला आहे.

राहुल गांधी, आदित्य ठाकरेंची मुलाखत घेणारी सुप्रसिद्ध यूट्यूबर वादात : तात्काळ अटक करा, भाजपची मागणी

‘2018 : एव्हरीवन हिरो’ हा चित्रपट केरळमध्ये आलेल्या महापुरावर आधारित कथा असणारा चित्रपट आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यावर माणुसकी कशाप्रकारे मात करू शकते? हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. तर हा चित्रपट बनवण्यासाठी 12 कोटींचा खर्च आला होता. चित्रपटाने तब्बल 100 कोटींहून अधिक कामाई केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube