दिल्लीतील नेत्यांशी आमचे संबंध मधुर; 23 जागाचं लढवणार, राऊतांनी ठासून सांगितलं

  • Written By: Published:
दिल्लीतील नेत्यांशी आमचे संबंध मधुर; 23 जागाचं लढवणार, राऊतांनी ठासून सांगितलं

Sanjay Raut On Loksabha Seat : आगामी लोकसभेपूर्वी काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपांवरून कलगीतुरा रंगला असून, दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी आमचे संबंध मधुर असून, आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष 23 जागा लढवणार असल्याचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) ठासून सांगितले आहे. याची चर्चा राज्यात नव्हे तर, दिल्लीत हायकमांडसोबत होईल असेही राऊतांनी स्पष्ट केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

काश्मिरमध्ये जवानांची कत्तल अन् सरकार उत्सवात मग्न; लाज काढत राऊतांनी काढले वाभाडे

काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात सर्व 48 जागांवर निवडणूक लढवावी. उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी, खर्गे आम्ही एकत्र बसून चर्चा केली आहे. त्या चर्चेत काय घडलं? ते आम्हाला माहिती आहे. जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही तर, दिल्लीत हायकामांड समोर होईल. प्रकाश आंबेडकर यांची देखील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही नेता नाही, जो निर्णय घेऊ शकेल, जर नेता आहे तर त्याला निर्णयाचा अधिकार नाही. सातत्याने त्यांना दिल्लीला विचारावं लागतं. त्यापेक्षा आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करु असे म्हणत राऊतांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Manoj Jarange : ‘नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नका, आरक्षण घेतल्याविना’..; जरांगेंचा स्पष्ट इशारा

राऊतांचा दावा वडेट्टीवारांनी काढला खोडून

दुसरीकडे राऊतांनी ज्या पद्धतीने जागा लढवण्याचा दावा केला आहे. त्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात वादाचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी राऊतांनी केलेल्या दावा खोडून काढला आहे. ते म्हणाले की, कोण किती जागा लढणार हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. ज्यांची ज्या ठिकाणी शक्ती जास्त आहे तेथे तो पक्ष जागा लढवेल. आम्ही मेरिटवर जाऊ याबाबत अद्यप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून, याचा निर्णय हायकामांड घेतील. जागावाटपाचा निर्णय राज्य स्तरावरचा नसून, केंद्रीय स्तरावरील असल्याचे वडेट्टीवारांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube