राहुल गांधी, आदित्य ठाकरेंची मुलाखत घेणारी सुप्रसिद्ध यूट्यूबर वादात : तात्काळ अटक करा, भाजपची मागणी

राहुल गांधी, आदित्य ठाकरेंची मुलाखत घेणारी सुप्रसिद्ध यूट्यूबर वादात : तात्काळ अटक करा, भाजपची मागणी

पुरी : येथील श्री. जगन्नाथ मंदिरात बीफ खाऊन प्रवेश केल्याचा आरोप करत सुप्रसिद्ध यूट्यूबर कामिया जानी (Kamiya Jani) आणि बिजू जनता दलाचे नेते व्हीके पांडियन यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी ओडिसा भाजपने केली आहे. समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात दोघांवरही आयपीसी कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि दोघांनाही तात्काळ अटक केली जावी. जर त्यांना अटक केली नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ,” असा इशाराही ओडिशा भाजपचे सरचिटणीस जतीन मोहंती यांनी दिला आहे. (odisha BJP demands arrest of YouTuber Kamiya Jani and BJD leader VK Pandian over Jagannath temple video)

काय आहे प्रकरण?

कामिया जानी हिने तिच्या कर्ली टेल्स या यूट्यूब चॅनेवरती नुकतेच पांडियन यांच्यासोबत पुरी येथील जगन्नाथ मंदिरात ‘महाप्रसाद’ खातानाच व्हिडिओ पोस्ट केला होता. मात्र कामिया जानी हिने काही दिवसांपूर्वी गोमांस खात असल्याचाही व्हिडिओही पोस्ट केला होता. जगन्नाथ मंदिरात बीफ खाणाऱ्यांना सक्त मनाई आहे. मात्र त्यानंतरही तिने बीफ खाऊन जगन्नाथ मंदिरात प्रवेश करुन समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आयपीसी कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि दोघांनाही तात्काळ अटक केली जावी. जर त्यांना अटक केली नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ.

काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडिओमध्ये कामिया जानी पुरी श्रीमंदिर हेरिटेज कॉरिडॉर प्रकल्पाचा प्रचार करताना आणि बिजू जनता दलाचे नेते पांडियन यांच्यासोबत महाप्रसाद खाताना दिसत आहे. हाच व्हिडीओ पब्लिश झाल्यानंतर वाद उभा राहिला आहे. ओडिशा भाजपने एक्स वर म्हटले की, “बिजू जनता दल ओडियांच्या भावना आणि जगन्नाथ संस्कृतीच्या पावित्र्याबाबत उदासीन आहेत. याला जबाबदार असणाऱ्यांना तीव्र आणि गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा देत भाजपने कामिया जानीच्या जुन्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. यात ती “बीफ डिश” चा प्रचार करताना दिसत आहे.

कामिया जानी काय म्हणाली?

या वादानंतर कामिया जानी हिने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे की, तिने कधीही गोमांस खाल्ले नाही. एक भारतीय म्हणून, भारतीय संस्कृती आणि वारसा जगासमोर नेणे हे माझे ध्येय आहे. हे माझे भाग्य आहे की मी भारतातील सर्व ज्योतिर्लिंगांना आणि चार धामांना भेट देऊ शकली. सकाळी जेव्हा मी वृत्तपत्र पाहिली तेव्हा त्यात माझ्याबद्दल विचित्र बातम्या छापल्या होत्या. वृत्तपत्रात माझ्या जगन्नाथ मंदिराच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माझ्याशी अजून कोणीही संपर्क केलेला नाही. पण मला एवढेच स्पष्ट करायचे आहे की मी कधीही गोमांस खात नाही आणि यापूर्वीही कधी खाल्लेले नाही. जय जगन्नाथ! असे तिने म्हटले आहे.

कोण आहे कामिया जानी?

कामिया जानी ही एक सुप्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर म्हणून ओळखली जाते. यूट्यूब वर तिचे 20 लाख 77 हजार सबस्क्राईबर्स आहेत. तर फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. प्रसिद्ध नेते, अभिनेते, खेळाडूंच्या मुलाखती घेण्यासाठी ती ओळखली जाते. यापूर्वी तिने भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे आणि अन्य राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. सोबतच भारतातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळांवर तिने व्हिडीओज केले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube