Download App

अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी ‘भंडारदरा’ 83 टक्के भरले तर निळवंडे धरण…

Ahmednagar News : राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले आहे तर जिल्ह्यातील धरणांमध्ये देखील पाणीसाठा वाढला आहे. यातच नगर जिल्ह्याची जीवनदायनी असलेले भंडारदरा धरणाच्या पाणीपातळीत देखील चांगलीच वाढ झाली आहे. भंडारदरा धरण हे सध्या स्थितीला 83 टक्के भरले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये धरण परिसरात पावसाचा वेग मंदावला आहे. असे असले तरी पावसाची परिस्थिती पाहता येत्या काही कळतच भंडारदरा धरण 100 टक्के भरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. (Ahmednagar News Bhandardara dam full Nilvande Still waiting )

उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’

जिल्ह्यात आजही अनेक ठिकाणी पावसाने हुलकावणी दिली आहे. तर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असल्याने धबधबे कोसळू लागले आहे. तर अनेक ठिकाणच्या धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याच्या देखील नोंदी आहे. दरम्यान अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरणाच्या पाठोपाठ जिल्हयातील महत्वाचे असे निळवंडे धरणही 50 टक्के भरले असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते आहे.

ठाकरे-राऊत हे वग नाट्यातले राजे अन् वजीर, ती मुलाखत म्हणजे करमणूक; पडळकरांचा टोला

दरम्यान भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील पाऊस मंदावला असल्याने धरणाच्या सांडव्यातुन पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह कळसुबाई शिखरावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा 50 टक्‍क्‍यांच्या पुढे गेला असून धरणामध्ये 4385 दलघफु पाणी जमा झाले आहे.

भंडारदाराकडे पर्यटक होतायत आकर्षक
जिल्ह्यात काही अंशी पावसाने हजेरी लावली आहे. यातच भंडारदरा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे भंडारदऱ्याचं निसर्ग सौदर्य खुललं आहे. पावसामुळे परिसरातील अनेक ठिकाणी छोटे मोठे धबधबे हे वाहू लागले आहे. उंचावरून पडणारे धबधबे आता पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. यातच निसर्गाचं हे सौंदर्य पाहण्यासाठी आता पर्यटकांचे पाऊले देखील भंडारदराच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे.

Tags

follow us