Download App

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार! जाणून घ्या प्रकरण…

जामखेड तालुका मोहा गावामधील अवैधरित्या खडी क्रेशर चालून पर्यावरणाचा नाश होत, असा आरोप जामखेड तालुक्यातील मानव विकास परिषद तालुका उपाध्यक्ष सतीश पवार यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणातून पवार यांना काही इसमांकडून जबर मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सतीश पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण देखील केले. मात्र, प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्याने मानव विकास परिषदेच्यावतीने 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना काळे झेंडे दाखविले जाणार आहे, अशी माहिती सतीश पवार यांनी दिली आहे.

Ahmedangar News : कारचालकाचा ताबा सुटल्याने ट्रकला जोरदार धडक! अपघातात दोघे ठार तर तिघे जखमी…

याबाबत अधिक माहिती अशी, जिल्ह्यामधील जामखेड तालुका मोहा गावामधील अवैधरित्या खडी क्रेशर चालून पर्यावरणाचा नाश होत आहे. या संदर्भात जामखेड तालुक्यातील मानव विकास परिषद तालुका उपाध्यक्ष सतीश पवार यांनी आवाज उठविला आहे. पवार यांनी 22 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अवैद्य खडी क्रेशर चालक वर खानधारक तसेच जामखेड तालुका तहसीलदार मंडलाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी तक्रारी दाखल केली होती.

<a href=”https://letsupp.com/mumbai/ajit-pawar-sharad-pawar-meet-row-sanjay-raut-mva-maharashtra-politics-77981.html”>राऊतांनी पवारांशी पंगा घेतलाच; तुम्ही नातीगोती जपायची अन् कार्यकर्त्यांनी डोकी फोडायची का?

दरम्यान, 27 जुलै 2023 रोजी सतीश पवार हे नेहमीप्रमाणे शेती कामाच्या कामासाठी शेतीत गेले होते, याचवेळी खडी क्रेशर चालकांनी 20 ते 25 लोकांनी शेतीमध्ये पवार यांना बेदम मारहाण केली. तसेच त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून नेऊन तहसीलदार आणि आमच्या विरोधात वरिष्ठ कार्याला तक्रार का करतो तुला जीवे मारू ठार मारून टाकू, आमच्या विरोधात तू काही करू शकत नाहीस आमचे हात लांबपर्यंत आहे असे धमकी देऊन मारहाण केली.

घडलेल्या घटनेचा मानव विकास परिषद संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी जाहीर निषेध केला. घटनेत मारहाण झालेले पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 ऑगस्ट 2023 रोजी उपोषण देखील सुरू केलं होते. पवार यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र या प्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नाईलाजाने 15 ऑगस्ट दिवशी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना काळे झेंडे दाखवणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

Tags

follow us