Ahmedangar News : कारचालकाचा ताबा सुटल्याने ट्रकला जोरदार धडक! अपघातात दोघे ठार तर तिघे जखमी…

Ahmedangar News : कारचालकाचा ताबा सुटल्याने ट्रकला जोरदार धडक! अपघातात दोघे ठार तर तिघे जखमी…

Ahmednagar News : नगर शहरात एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नगर दौंड रोडवरील कायनेटिक चौकाजवळ हा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाला असल्याने अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती.


NEET Exam : मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी संपवले जीवन; चेन्नईतील घटना

याबाबत अधिक माहिती अशी, विकी राजू कांबळे (21) रा. रांजनी माथणी, तेजस राजेंद्र ठोंबे, रा. खांडके यांच्यासह अन्य एक जण जखमी असून साहिल सादिक शेख रा. बुरुडगाव रोड, संतोष मोरे, रा. चिपाडे मळा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. नगर दौड रोडवरून नगरच्या दिशेने एक कार येत होती. ही कार पांजरपोळ संस्थेजवळ आली असता चालकाचा कारवरील ताबा अचानक सुटला. कार पूर्णतः अनियंत्रित झाल्याने ती थेट विरुद्ध दिशेला जाऊन ट्रक वर जोरात आदळली. यात कारचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Jailer: थलायवाच्या ‘जेलर’ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई; 4 दिवसात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई!

अपघात घडल्यानंतर जखमी झालेल्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून अपघतात मृत झालेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. शहरातल्या वर्दळीच्या ठिकाणीच हा अपघाता घडल्याने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.

धक्कादायक बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडतच आहे. अनेकदा वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात घडल्याचे समोर आले आहे. नुकतेच शिर्डीमध्ये दोन अपघात झाले होते. एका अपघातामध्ये बस दुभाजकाला धडकत अक्षरशः ड्रायव्हर जवळ बसलेले प्रवाशी थेट काच फुटून बाहेर फेकले गेले होते. तर दरवाजामधील प्रवाशी दरवाजातून बाहेर फेकले गेले होते. तसेच राहात्याजवळ एक बस थेट टोलनाक्यावरच जाऊन धडकली होती. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube