Download App

Ahmednagar News : गो बॅक गो बॅक मोदी सरकार गो बॅक… भाजपच्या रथ यात्रेला शेतकऱ्यांकडून विरोध

  • Written By: Last Updated:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News ) पाथर्डी तालुक्यात नरेंद्र मोदी सरकारच्या आपला संकल्प विकसित भारत या रथयात्रेला शेतकऱ्यांकडून विरोध झाला. मोदी सरकारने गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे यासाठी यावेळी निदर्शने करण्यात आली तसेच गो बॅक गो बॅक मोदी सरकार गो बॅक अशा घोषणाबाजी करत मोदी सरकार हे फसव्या असून शेतकऱ्यांच्या विषयी आत्मीयता नसलेले सरकार आहे अशी घोषणाबाजी तरुण शेतकऱ्यांनी केली.

मोठी बातमी! जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदारांची आमदारकी रद्द

आपला संकल्प विकसित भारत या केंद्र सरकारच्या हृदयात्रेचे यातील पाथर्डी तालुक्यात आगमन झाले होते यावेळी कामांचे माहिती दिली जात असतानाच काही शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी बोलताना शेतकरी म्हणाले, गरीब जनतेला 2014 साली तुम्ही प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील असे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? कांद्याला दोन पैसे मिळायला लागले तर तुम्ही निर्यात बंदीचा डाव साधला.

Houthi Drone Attack : धक्कादायक! भारताचा झेंडा असलेल्या जहाजावर हुती बंडखोरांचा ड्रोन हल्ला

बाजारात योग्य भाव मिळत नसल्यानेआज कापूस उत्पादक शेतकऱ्याला फाशी घेण्याची वेळ आली आहे. एकीकडे अशी परिस्थिती असली तरीही या रथयात्रेच्या माध्यमातून सरकार आपले कौतुक करत आहे. या रथयात्रेचा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो.

केंद्र सरकारला मोदी सरकारला जर शेतकऱ्यांची मालाला किंमत मिळवून द्यावी तसेच दूध दराचा असलेला प्रश्न तातडीने सोडवावा महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने करावा तसेच गोरगरीब जनतेची फसवणूक करण्याची काम या सरकारने बंद करावे अशी मागणी यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केली.

केंद्र सरकार आपल्या प्रचारासाठी प्रशासकीय यंत्रणांचा वापर करत आहेत मात्र या प्रशासकीय व्यक्तींना आम्ही जो टॅक्स भरतो त्यातून वेतन दिले जाते. सरकारच्या या कौतुकासाठी प्रशासनाला वेठीस धरले जाऊ नये अशी मागणी देखील यावेळी शेतकऱ्यांनी केली

Tags

follow us