Video; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवला ताफा, रुग्णवाहिकेला दिला रस्ता

  • Written By: Published:
Narendra Modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचा ताफा वाराणसीच्या (Varanasi) अर्दली बाजारपेठेतून जात होता. यावेळी त्यांच्या ताफ्याने तेथून जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला रस्ता दिला आणि ताफ्याच्या बाजूने रुग्णवाहिका गेली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नादेसर येथील कटिंग मेमोरियलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या ताफ्यासमोर एक रुग्णवाहिका आली होती. यादरम्यान पंतप्रधानांनी त्यांचा ताफा थांबवला आणि रुग्णवाहिकेला रस्ता दिला.

वाराणसीमध्ये पोहोचल्यानंतर लोकांनी पंतप्रधानांच्या ताफ्यावर फुलांचा वर्षाव केला. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांनी मोदींच्या स्वागतासाठी घोषणाबाजी केली. तत्पूर्वी, 1 डिसेंबर 2022 रोजी अहमदाबाद, गुजरात येथे त्यांच्या रोड शो दरम्यान, पंतप्रधान मोदींनी रुग्णवाहिकेला जाण्यासाठी ताफा थांबवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीतील बाबपूर विमानतळावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले.

अदानी कालपर्यंत मित्र आज विरोधक कसे? कंबोजांनी ठाकरेंना मागितला खुलासा

नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे पोहोचले आहेत. यादरम्यान ते काशी आणि पूर्वांचलसाठी 19 हजार कोटींहून अधिक किमतीच्या 37 प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. वाराणसी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी संध्याकाळी नमो घाट येथून काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहेत.

Elections 2024 : महाराष्ट्रात भाजपाचा एमपी-राजस्थान पॅटर्न? आमदार-खासदारांचं तिकीटच ‘अनसेफ’

पीएम मोदी कन्याकुमारी ते बनारस येथून काशी तमिळ संगम एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 17 ते 31 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या काशी तामिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीत तामिळनाडू आणि पुद्दुचेरीतील 1400 मान्यवर वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्याला भेट देणार आहेत. तमिळनाडू आणि काशी येथील कला, संगीत, हातमाग, हस्तकला, ​​पाककृती आणि इतर विशेष उत्पादनांचे प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. याशिवाय काशी आणि तामिळनाडूच्या संस्कृतींवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहे.

follow us