Ahmednagar News : एका अल्पवयीन विद्यार्थीनीचे हात-पाय आणि तोंड बांधून शाळेच्या छतावर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय. दरम्यान, अहमदनगरमधील पिंपळगाव उज्जैनी इथल्या शाळेत हा प्रकार घडलायं. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवार दि. 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास एका अज्ञान व्यक्तीने एका अल्पवयीन विद्यार्थीनीचे तोंड, हात-पाय बांधून तिला शाळेच्या छतावर बांधून ठेवले. थोड्याच वेळानंतर शाळेच्या छतावरुन आवाज येत असल्याचं समजताच गावकऱ्यांनी शाळेच्या छतावर धाव घेतली. यावेळी अल्पवयीन मुलीचे हात-पाय, तोंड बांधलेल्या अवस्थेमध्ये ती आढळून आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडालीयं.
Koyna Dam: कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग बंद; धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकाराबाबत संपूर्ण उलगडा होईल. मागील काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका मुलीची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या मुलीच्या अंगावर वार करुन तिला फेकले असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून लग्नाला नकार दिल्याने आरोपीने तिची हत्या केली असल्याचं तपासात उघड झालं होतं.
दरम्यान, अहमदनगर शहर आणि परिसरात अल्पवयीन मुलींची छेडछाड तसंच अपहरणाचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळं पालक आणि मुलींमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.