Ahmednagar Politics : राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुका आहेत (Maharashtra Elections) मात्र आता त्यापूर्वीच नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघामध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून मी स्वतः इच्छुक आहे. लोकच ठरवतील कुणाला निवडून जायचं आणि कुणाला खाली बसवायचं. लोकसभेत (Lok Sabha Election) आघाडी धर्म पाळत आम्ही निलेश लंकेंना खासदार (Nilesh Lanke) बनवलं. त्यामुळे लंके हे स्वतःच शिवसैनिकांना पाठबळ देतील असा विश्वास यावेळी पारनेरचे ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष डॉ. श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केला.
नगर-पारनेर मतदारसंघांमधून महाविकास आघाडीमधून ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. लोकसभेच्या वेळेस आम्ही आघाडी धर्म पाळत निलेश लंके यांच्यासाठी काम केलं. नगर लोकसभा मतदारसंघात लंके खासदार झाले. त्यांच्या विजयामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. खासदार लंके देखील कार्यकर्त्यांवर भर देणारे नेतृत्व आहे. त्यामुळे आता पारनेर विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडण्यात यावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे. मात्र शेवटी महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष मिळूनच काय तो निर्णय घेतील, असे पठारे यावेळी म्हणाले.
मला कुणी विरोधक नाही; असं का म्हणाले नगरचे खासदार? पाहा लेट्सअप मराठीवर बेधडक निलेश लंके
तसेच पुढे बोलताना पठारे म्हणाले की आम्ही पक्षादेश मानणारे कार्यकर्ते असून उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असणार आहे. लोकच ठरवतील कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला खाली बसवायचं. जागेबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईलच अशा शब्दात एकप्रकारे डॉ. पठारे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
पारनेर मतदारसंघातून महाविकास आघाडीमधून ठाकरे गटाकडून डॉ. श्रीकांत पठारे इच्छुक आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून खासदार लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचे नाव देखील विधानसभेसाठी चर्चेत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी केलेल्या कामाची दखल घेत लंके शिवसैनिकांना बळ देतील तसेच शरद पवार असो अथवा उद्धव ठाकरे नेते आहेत. निलेश लंके हे देखील आमचे महाविकास आघाडीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू तसेच ते स्वतःच शिवसैनिकांना योग्य पद्धतीने ही जागा उपलब्ध करून देतील असा विश्वास यावेळी पठारे यांनी व्यक्त केला.
पारनेरचा आमदार शिवसेनेचा होणार.., पठारेंनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले!