Ahmednagar News : पावसामुळे अनेक पर्यटन ठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहे. यातच निसर्गाचे खुलले सौंदर्य मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी पर्यटक नेहमीच अग्रेसर असतात. मात्र हे सगळे करता असताना स्वतःची काळजी घेणे हे ते विसरतात व नको ती घटना घडते. असाच काहीसा प्रकार भंडारदऱ्यात घडला आहे. रंधा फॉलजवळ सेल्फी घेण्याच्या नादात एक तरुण थेट पाण्यात पडल्याची घटना घडली. या घटनेमध्ये संबंधित तरुणाचा मृत्यू झाला आहे. सुमित बाबासाहेब वाघमारे (वय 21) हा असे मयत तरुणाचा नाव आहे.
Jio Financial Services बीएसईवर 265 रूपयांना लिस्ट पण तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला
याबाबत अधिक माहिती अशी, सुमित वाघमारे हा तरुण आपला भाऊ सुशांत बाबासाहेब वाघमारेसह शिर्डीच्या अन्य मित्रांसह पर्यटनासाठी भंडारदरा धरणावर गेला होता.आपल्या मित्रांसमवेत रंधा धबधबा बघत असताना सेल्फी घेण्याच्या नादात त्याचा पाय घसरुन तो नदीत पडला व तसाच रंधा धबधब्यातुन वाहत गेला. यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
समृध्दी महामार्गावर फोटो किंवा रील्स काढाल तर तुरुंगात जाल, महामार्ग पोलिसांचा इशारा
याबाबतची माहिती राजुर पोलीस ठाण्याला समजताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून सुमितचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरु झाला यासाठी स्थानिकांचीही मदत घेण्यात आली. रंधा धबधब्याच्या कोसळत्या पाण्याचाही अडथळा येत होता. गळाच्या सहाय्यानेही तपासकार्य सुरू ठेवण्यात आले होते. अखेरीस रात्री ९ वाजता सुमितचा मृतदेह रंधा धबधब्याच्या डोहामध्ये आढळुन आला.
पोलिसांचे पर्यटकांना आवाहन
भंडारदरा पर्यटनासाठी आलेल्या अतिउत्साही तरुणांनी निसर्ग पर्यटनाचा शांततेत आनंद उपभोगावा, तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह टाळावा, असे आवाहन सहाय्यक निरिक्षक प्रविण दातरे यांनी केले आहे.