Nilesh Lanke : नगर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जाहीर करा, अन्यथा… आमदार लंकेंचा प्रशासनाला इशारा

Nilesh Lanke : यंदा जिल्ह्यात पावसानं अल्प प्रतिसाद दिल्याने अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकताच शासनाकडून काही भागांमध्ये दुष्काळ जाहीर (Drought declared)करण्यात आला. मात्र नगर जिल्ह्याचा यामध्ये समावेश नसल्याने राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे (NCP Ajitdada Group)आमदार निलेश लंके Nilesh Lankeआक्रमक झाले आहेत. ‘त्या’ नेतेमंडळींनी लक्ष द्यायला हवे होते; नगर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळ्यानं […]

Nilesh Lanke आज राजीनामा देणार? मतदारसंघातून लोकसभेचे रणशिंग फुंकणार

Nilesh Lanke

Nilesh Lanke : यंदा जिल्ह्यात पावसानं अल्प प्रतिसाद दिल्याने अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकताच शासनाकडून काही भागांमध्ये दुष्काळ जाहीर (Drought declared)करण्यात आला. मात्र नगर जिल्ह्याचा यामध्ये समावेश नसल्याने राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे (NCP Ajitdada Group)आमदार निलेश लंके Nilesh Lankeआक्रमक झाले आहेत.

‘त्या’ नेतेमंडळींनी लक्ष द्यायला हवे होते; नगर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळ्यानं लंकेंनी डिवचलं…

नगर जिल्ह्याला देखील दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा, अशी मागणी आमदार लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांकडे केली आहे. मात्र याबाबत काही निर्णय न झाल्यास, यासाठी थेट कोर्टाची देखील पायरी चढणार असल्याचा इशारा यावेळी आमदार निलेश लंके यांनी दिला आहे.

एकनाथ खडसेंना ह्रदयविकाराचा झटका; तात्काळ एअर ॲम्ब्युलन्स पाठवण्याचे CM शिंदेंचे आदेश

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी नुकतेच जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. जिल्ह्याला दुष्काळग्रस्त भागातून डावलण्यात आले असल्याने लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याची कल्पना दिली. त्यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदारा लंके म्हणाले, जिल्ह्यात उत्तरेकडे काहिसा पाऊस झाला मात्र दक्षिणेतील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने अक्षरशः पाठ फिरवली आहे. यावेळी लंके यांनी थेट आकडेवारीच सांगितली.

तसेच पुढे बोलताना लंके म्हणाले, पाथर्डी तालुक्यात भयाण परिस्थिती असून याठिकाणी टँकरची मागणी होत आहे. तसेच शासनाकडे पाठवण्यात आलेली तालुक्याची पावसाची आकडेवारी ही खोटी आहे, असे देखील यावेळी लंके म्हणाले. ज्या कंपन्यांकडून नगर जिल्ह्याचा सर्व्हे करण्यात आला, तो सर्व्हे हा चुकीचा आहे यामुळे आज हा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर होण्यापासून वंचित राहिला आहे.

आपल्याकडे खूपच कमी पाऊस झाला आहे, याबाबत मी सर्व माहिती जिल्हाधिकारी यांना दिली आहे. तसेच मी जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा यासाठी, मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. माझ्या जिल्ह्यावर अन्याय झाला आहे, याबाबात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मात्र एवढं करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही तर मी आपण यासाठी कोर्टात जाणार व ही लढाई जिंकणार असेही लंके यावेळी म्हणाले.

Exit mobile version