एकनाथ खडसेंना ह्रदयविकाराचा झटका; तात्काळ एअर ॲम्ब्युलन्स पाठवण्याचे CM शिंदेंचे आदेश

एकनाथ खडसेंना ह्रदयविकाराचा झटका; तात्काळ एअर ॲम्ब्युलन्स पाठवण्याचे CM शिंदेंचे आदेश

सातारा : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. याबाबतचा फोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आला होता. त्यानंतर शिंदे यांनी तात्काळ एअर ॲम्ब्युलन्स पाठवण्याचे आदेश दिले आहेत. (NCP (Sharad Pawar) MLC Eknath Khadse suffered a heart attack)

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज सकाळपासून एकनाथ खडसे भुसावळ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, सकाळपासूनच त्यांना अस्वस्थ वाटत होते. मात्र दुपारच्या सुमारास खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून एअर ॲम्ब्युलन्स मागणी केली.

एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी आहेत. खडसे यांच्या तब्येतीबाबतची माहिती समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सुत्र हालवली आणि तात्काळ एअर ॲम्ब्युलन्स पाठविण्याचे आदेश दिले. सध्या खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला आणले जाणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube