अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावरील वाहतूक ‘या’ मार्गाने वळविणार

अहमदनगर : नगर रायझिंग फाउंडेशन तर्फे रविवारी (ता. 5) नगर रायझिंग मॅरेथॉन स्पर्धा अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी पहाटे 5 ते सकाळी 10 या वेळेत या रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज (गुरुवारी) काढले. या कालावधीत पाथर्डी- अहमदनगर अशी ये-जा करणाऱ्या अवजड वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. […]

Untitled Design   2023 02 03T110602.058

Untitled Design 2023 02 03T110602.058

अहमदनगर : नगर रायझिंग फाउंडेशन तर्फे रविवारी (ता. 5) नगर रायझिंग मॅरेथॉन स्पर्धा अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी पहाटे 5 ते सकाळी 10 या वेळेत या रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज (गुरुवारी) काढले.

या कालावधीत पाथर्डी- अहमदनगर अशी ये-जा करणाऱ्या अवजड वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र सर्व प्रकारची हलकी वाहने सारोळा बद्दी मार्गे – जामखेड रस्त्याने अहमदनगर मार्गे ये-जा करू शकतील. आयकर भवन येथून अहमदनगर क्लब (भुईकोट किल्ला) कडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

अहमदनगर क्लब मैदान – लकडी पूल – कॉन्व्हेंट चौक, किल्ला मैदान चौक – कार्यालय समोरील चौक, जॉगींग पार्क चौक- कॅन्टोन्मेंट सी ओ निवासस्थानासमोर चौक नगर पाथर्डी महामार्ग या मॅरेथॉन मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. नगर पाथर्डी महामार्गावरील भिंगार येथील पंचशिल नगर वेस समोरील चौकापासून चाँदबिबी महाल पर्यंतच्या रस्त्यावर फक्त दुचाकी वाहने, एस टी बस, अॅम्ब्युलन्स व इतर हलकी शासकीय वाहने यांना प्रवेश करता येईल. असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Exit mobile version