Download App

Ahmednagar Politics : नगरच्या विकासासाठी काय केलं? आ. जगतापांनी विरोधकांना सुनावत यादीच दिली

Ahmednagar Politics : नगर शहरात आधीच्या लोकांना विकासाचे काही देणेघेणे नव्हते. लोकांना विकासच माहित नव्हता. गेल्या ७ ते ८ वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरात आणण्यात यशस्वी झालो. आता कुठे लोक विकासावर बोलू लागले आहेत. विकासाच्या नावावर चर्चा होते, आरोप-प्रत्यारोप होतात हे पाहून समाधान वाटते अशा शब्दांत आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी शहरातील विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. आता या वक्तव्यातून आमदार जगताप यांनी कुणाला निशाण्यावर घेतलं याची जोरदार चर्चा नगरच्या राजकारणात (Ahmednagar Politics) सुरू झाली आहे.

मागील काही दिवसांपासून भाजप खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार जगताप बऱ्याच कार्यक्रमात एकत्र दिसले आहेत. दोघांचीही सहमती एक्सप्रेस नगर शहरात वेगाने धावत आहेत. यातून काही वेगळे राजकीय समीकरण निवडणुकीच्या तोंडावर समोर येते का याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, शहरातील ठाकरे गट सावध झाला आहे. त्यांच्याकडून दोन्ही नेत्यांवर टीका होत असते.

Ahmednagar : आंदोलनातून भाजपाची लक्षवेधी! शिंगणापूर देवस्थानच्या कारभाराची होणार चौकशी

नगर महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आमदार संग्राम जगताप हे बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे ही शहरे विकसित झाली. नगर शहराचा विकास कधी असा प्रश्न होता. शहराच्या विकासासाठी आपण काही तरी केले पाहिजे. याच हेतूने विधानसभेत गेल्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणण्यात यशस्वी झालो.

नगर शहरात आधीच्या लोकांना विकासाचे काही देणे घेणे नव्हते. लोकांना विकासच माहित नव्हता. गेल्या ७ ते ८ वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरात आणण्यात यशस्वी झालो. आता कुठे लोक विकासावर बोलू लागले आहेत. विकासावर आरोप-प्रत्यारोप होत असल्याने समाधान वाटते, असे टोले देखील जगतापांनी नाव न घेता विरोधकांना लगावले.

1972 मध्ये पाणीयोजना झाली होती. त्यानंतर नवीन पाणीयोजना नव्हती. त्यासाठी अमृत पाणीयोजना आणली. तसेच फेज टू ही पाणी वितरणाची योजना आणली. त्याचा लवकरच लोकार्पण सोहळा होणार आहे. 60 व 50 लाख लीटर पाण्याच्या टाक्या उपलब्ध झाल्या आहेत. शहरातील मुलभूत सोयी सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले, असे जगताप म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर, महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.

Ahmednagar News : भूकंप सदृश्य धक्क्यांनी हृदयाचा ठोका चुकला! पण सत्य ऐकून सगळेच चकित

Tags

follow us