Ahmednagar News : भूकंप सदृश्य धक्क्यांनी हृदयाचा ठोका चुकला! पण सत्य ऐकून सगळेच चकित

Ahmednagar News : भूकंप सदृश्य धक्क्यांनी हृदयाचा ठोका चुकला! पण सत्य ऐकून सगळेच चकित

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) के.के.रेंज परिसरात लष्कराकडून युध्द सराव सुरू केल्यानंतर पारनेर तालुक्याच्या अनेक गावांमध्ये भुकंपसदृश धक्के बसल्याने पारनेरकरांच्या हृदयाचा ठोका चुकला. दारे खिडक्या वाजू लागल्याने अनेक नागरीक घराबाहेर येऊन उभे राहिले. बुधवारी रात्री 9 वाजून 50 मिनिटे ते 10 वाजण्याच्या दरम्यान हे धक्के जाणवले. अचानक धक्के सुरू झाल्याने गांगरून गेलेले अनेक नागरीक सुरक्षेचा उपाय म्हणून घराबाहेर येऊन थांबले.

Israel Hamas War : हमासचा पलटवार! गाझात अंदाधुंद गोळीबार, 9 इस्त्रायली सैनिकांचा मृत्यू

पण सत्य ऐकून सगळेच चकित…

काही काळातच के.के रेंजचा युध्द सराव सुरू असल्याची माहीती सोशल मिडीयावरून पुढे आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. याबाबत बोलताना प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी सांगितले की, लष्कराचा वर्षअखेचा युध्द सराव ढवळपुरी परिसरात सुरू असून या सरावामुळे पारनेर तालुक्यासह नगर शहराचा काही भाग तसेच नगर तालुक्यालाही हादरे बसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, भुकंपसदृश हादरे बसल्यानंतर काही काळानंतर लष्कराच्या विमानांच्या घिरटया आकाशामध्ये सुरू होत्या असेही नागरीक म्हणाले.

Telangana : काँग्रेसचा निर्णय अन् भाजप आमदारांनी घेतली शपथ; तेलंगणाच्या राजकीय नाट्याला फुलस्टॉप!

दरम्यान, के.के. रेंजच्या भुसंपादनास विरोध करणारे वनकुट्याचे माजी सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांनी तात्काळ सोशल मिडियावरून लष्करी युध्दाच्या सरावामुळे हे हादरे बसत असून भुकंप वगैरे काही नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर नागरीक सुखाने झोपी गेले. यासंदर्भात बोलताना अ‍ॅड. राहुल झावरे म्हणाले, आहे त्या भुसंपादनामुळे पारनेर, नगर तालुका हदरत असताना लष्करास आणखी जमिनींचे भुसंपादन कशाला हवे आहे ? आणखी भुसंपादन केले तर लष्करी सरावादरम्यान आज हादरणारी घरे जमीनदोस्त होण्यास वेळ लागणार नाही.

झावरे पुढे म्हणाले, लष्कराने जमिनींचे भुसंपादन करण्याची अधिसुचना जारी केल्यानंतर आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून आपण या भूमिकेस विरोध करण्याची गळ घातली. आ. लंके यांनी खा. शरद पवार यांच्याकडे याबाबत गाऱ्हाणे मांडल्यानंतर शरद पवार यांच्या पुढाकारातून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांची दिल्ली येथे बैठक पार पडली.या बैठकीत शरद पवार यांनी आणखी भुसंपादन झाल्यानंतर किती धोका निर्माण होऊ शकतो हे संरक्षण मंत्री तसेच तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिले. खा. पवारांनी वस्तुनिष्ट भूमिका मांडल्यानंतर संरक्षणमंत्र्यांसह लष्कराच्या तीन्ही प्रमुखांनी के.के.रेंजसाठी भुसंपादन होणार नाही याची ग्वाही दिली होती. तिथेच हा विषय बंद झाल्याचे अ‍ॅड. झावरे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube